प.पू. डॉक्टरांच्या देवघरातील पादुकांतून प्रक्षेपित
होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेला
अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन !

स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी, अंनिसवाले इत्यादी म्हणणार्‍यांनी आतापर्यंत सनातन करते असे एकतरी संशोधन केले आहे का ? – (प.पू.) डॉ. आठवले (५.२.२०१४)

पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त झालेली प्रभावळींची छायाचित्र


पादुका ठेवण्यापूर्वीचे प्रभावळीचे छायाचित्र (छायाचित्र क्र. १)


पादुका ठेवल्यानंतरचे प्रभावळीचे छायाचित्र (छायाचित्र क्र. २)

१. प.पू. डॉक्टरांच्या देवघरातील शंख आणि सूर्य ही चिन्हे असलेल्या पादुका

वर्ष २००३ पासून प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील देवघरात २ सें.मी. लांबी आणि १ सें.मी. रूंदी असलेल्या चांदीच्या छोट्या पादुका आहेत. त्यांतील डाव्या पादुकेवर शंख आणि उजव्या पादुकेवर सूर्य आहे. या पादुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील प.पू. दास महाराज यांनी दिल्या आहेत.

२. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही किंवा ती वस्तू आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक वस्तूतील स्पंदनांचे निदान अचूक लावू शकतात. भक्त, साधक संतांनी सांगितलेले शब्दप्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध केली असेल, तरच ती खरी वाटते. येथे प.पू. डॉक्टरांच्या देवघरातील शंख आणि सूर्य ही चिन्हे असलेल्या पादुकांमधून कशी स्पंदने प्रक्षेपित होत आहेत, हे पडताळण्याच्या उद्देशाने त्यांची वैज्ञानिक चाचणी करण्यासाठी आर्.एफ्.आय. रीडिंग उपकरण आणि बायोफिल्ड इमेजिंग शास्त्रातील पिप तंत्रज्ञान यांचा उपयोग करण्यात आला. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

३. आर्.एफ्.आय. (RFI) रीडिंग उपकरण आणि पिप (PIP) तंत्रज्ञान यांची ओळख

आर्.एफ्.आय. (रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) रीडींग उपकरणाच्या साहाय्याने आपण वातावरणातील वैश्‍विक ऊर्जा मोजू शकतो, तर पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूभोवती असणार्‍या स्पंदनांची गती, तसेच त्या वस्तूची रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. पिप या संगणकीय उपकरणाला व्हिडीओ कॅमेर्‍याशी जोडून त्यात असलेल्या वेगवेगळ्या फिल्टरद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांची ऊर्जावलये पहाता येतात. हे उपकरण रंगांचे विभाजन करते. यात सकारात्मक आणि नकारात्मक रंग त्यांच्या क्षमतेनुसार दिसण्याची सोय आहे. पिप प्रणालीनुसार नारिंगी आणि जांभळा रंग तणावाची किंवा त्रासदायक स्पंदने यांचे प्रतीक आहे. गुलाबी रंग राजसिकतेचे प्रतीक आहे. हिरवा रंग आध्यात्मिक उपायांशी संबंधित सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. निळा (आकाशी) रंग सात्त्विकता किंवा शांती यांचे प्रतीक आहे, तर सोनेरी छटा असलेला पिवळा रंग उच्च स्तरीय वैश्‍विक स्पंदने दर्शवतो.

४. निरीक्षणे आणि त्यांचे विवरण

४ अ आर्.एफ्.आय. (रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) नोंद आणि तिचे विवरण

चाचणीसाठी पादुका ठेवण्यापूर्वी आर्.एफ्.आय. कंपनसंख्या १३९ मेगाहटर्स होती. या कंपनसंख्येचा रंग पिवळा आहे आणि तो सकारात्मकता दर्शवतो. पादुका ठेवल्यावर आर्.एफ्.आय. कंपनसंख्या १३१ मेगाहटर्स आली. या कंपनांचा रंग सोनेरी आहे. हा रंग आध्यात्मिकदृष्ट्या उच्च स्पंदने दर्शवतो. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पादुका ठेवल्यावर नोंद झालेल्या कंपनसंख्येत पालट न होता ती स्थिर राहिली होती. त्यामुळे हे लक्षात येते की, पादुकांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांत सातत्य आहे. अशा प्रकारे सदैव कार्यरत असणार्‍या या स्पंदनांच्या सान्निध्यात आल्यावर व्यक्ती किंवा वातावरण सकारात्मक होते.

४ आ. पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) द्वारे प्रभावळीचे केलेले वर्णन आणि त्याचे विवरण

चाचणीसाठी पादुका ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाच्या प्रभावळीमध्ये मुख्यत्वे नकारात्मकतेचा जांभळा आणि नारिंगी रंग दिसतो, तसेच अल्प प्रमाणात असलेला सकारात्मकतेचा हिरवा रंग दिसतो. (छायाचित्र क्र. १) पादुका चाचणीसाठी ठेवल्यानंतर मात्र वातावरणामध्ये चांगला पालट झाला. (छायाचित्र क्र. २) यावरून लक्षात येते की, पादुकांतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. प्रत्यक्ष पादुकांवर सोनेरी छटा दिसत आहे. हा उच्च आध्यात्मिक स्पंदनांचा रंग आहे. पादुकांच्या वरती गतीमान असा हिरवा रंग आणि त्यात आध्यात्मिकदृष्ट्या उच्च असा आकाशी रंग दिसत आहे. ही हिरव्या आणि आकाशी रंगांची वलये त्रासदायक अशा जांभळ्या अन् नारिंगी रंगांच्या वलयांना दूर लोटत आहेत.

– श्री. संतोष शामराव जोशी (वैश्‍विक ऊर्जा संशोधक, सर्वाश्रम वैश्‍विक आध्यात्मिक ऊर्जा संशोधन केंद्र, डोंबिवली) (१९.४.२०१२)

([email protected] gmail.com)

५. वैज्ञानिकांना आवाहन

या प्रयोगांच्या निष्कर्षांच्या संदर्भात सनातन संस्था अधिक संशोधन करत आहे. या संशोधनातील निरीक्षणांमागची आध्यात्मिक कारणमीमांसा संत सांगू शकतात; पण सामान्यजनांना प्रयोगांचे निष्कर्ष वैज्ञानिक भाषेत कळावेत, यासाठी वैज्ञानिकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा प्रकारच्या विषयांवर शास्त्रीय संशोधन करणार्‍यांकडून साहाय्य मिळाल्यास आम्ही आभारी होऊ.

(संपर्क : पू. डॉ. मुकुल गाडगीळ, इ-मेल : [email protected])

संदर्भ : दैनिक 'सनातन प्रभात'

Leave a Comment