उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांचीही भेट

सोलापूर, २६ सप्टेंबर (वार्ता.) – गणेशोत्सवाच्या काळात सनातन संस्थेच्या सोलापूर येथील सेवाकेंद्राला शहर उत्तर मतदारसंघाचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक नगरसेवकांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी सेवाकेंद्रातील राष्ट्र-धर्म कार्याविषयी त्यांना अवगत करण्यात आले.

आमदार विजयकुमार देशमुख यांनी सेवाकेंद्रात चालणार्या कार्याची माहिती घेऊन सेवारत साधकांशी संवाद साधला. स्वभावदोष फलकावरील नोंदी करण्याची पद्धत समजून घेत त्यांनी कौतुक केले. त्यांच्या हस्ते श्री गणपतीची आरती करण्यात आली. या वेळी सनातन संस्थेच्या पू. (कु.) दीपाली मतकर, हिरालाल तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, श्री. संकेत पिसाळ आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. विनोद रसाळ उपस्थित होते. सोलापूर महापालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांनी पती श्री. महेश देवकर यांच्यासमवेत सेवाकेंद्राला भेट दिली. या वेळी त्यांनी ‘हिंदु धर्माचे शिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे’, असे सांगितले, तसेच संस्थेच्या कार्यासाठी वेळ देण्याची इच्छा व्यक्त केली.




सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्री. देवेंद्र कोठे यांच्या पत्नी सौ. मोनिका कोठे यांनी ‘अन्नपूर्णा कक्षा’ची पहाणी करून साधिकांमधील सेवाभावाचे कौतुक केले. ‘तणावमुक्त जीवनासाठी साधना’, या विषयावर त्यांच्या संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांसाठी व्याख्यान आयोजित करण्याविषयी त्यांनी चर्चा केली. भाजपच्या नगरसेविका सौ. चैताली गायकवाड यांनी पती श्री. शिवराज गायकवाड यांच्यासमवेत सेवाकेंद्राला भेट देऊन त्यांनी त्यांच्या परिसरात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची इच्छा व्यक्त केली, तर भाजप नगरसेविका सौ. उज्ज्वला दासरी यांनी त्यांचे पती श्री. अविनाश दासरी यांच्यासमवेत सेवाकेंद्राला भेट देऊन त्यांनी संस्थेला आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
नाशिक कुंभमेळ्याच्या भव्य धर्मध्वज नगर परिक्रमेचे सनातन संस्थेने केले स्वागत !
प.पू. समर्थ शिवानंद स्वामी महाराज (भीष्माचार्य) यांचे समाधीगमन !
दीपावलीनिमित्त SanatanShop.com वर २५ % पर्यंत विशेष सवलत !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जडिगेनहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री कालभैरव देवतेचे घेतले...