चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय !

सनातनच्या रामनाथी आश्रमासमोरून जातांना गेली ८ वर्षे काही समाजद्रोही सनातन बॉम्ब, असे ओरडत जातात. काहीजण शिव्या देत जातात, काहीजण दगड फेकतात, तर काहीजण पेट्रोल बॉम्ब फेकतात. विविध संप्रदायांच्या भक्तांना, हिंदुत्ववाद्यांना आणि संतांना येणारे पुढील अनुभव वाचले की, लक्षात येईल की, सनातनविरोधी अशी कृत्ये करणारे असुरांच्या कह्यात आहेत. हिंदु राष्ट्रात त्यांचा नाश केला जाईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.६.२०१५)

आश्रमभेटीमुळे पावित्र्य आणि शुचिर्भूतता यांचा सुरेख संगम अनुभवला !

सनातन संस्थेला भेट देण्यापूर्वी माझ्या मनात काही शंका होत्या. त्यांचे निराकरण करण्याचा हेतू मनात ठेवून आज मी आश्रमात आलो. आता मला प्रांजळपणे मान्य करावेसे वाटते की, ही संस्था हिंदु समाजामध्ये जनजागृती करणे, तसेच हिंदु धर्मातील चांगल्या आणि पवित्र गोष्टींची जाणीवपूर्वक जपणूक करतांना दिसते. पावित्र्य आणि शुचिर्भूतता यांचा सुरेख संगमच या भेटीत मला आढळून आला. संस्थेचे अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे स्वप्न मला प्रत्यक्षात केव्हा बघायला मिळेल, याची उत्सुकता आहे. त्या पवित्र कार्यासाठी मी शुभेच्छा चिंततो !
– श्री. दीपक नरसिंह गोठे, पणजी, गोवा. (३१.७.२०१५)