धर्माचे शास्त्रशुद्ध आचरण करणारे आणि धर्म अन् विज्ञान यांची यथायोग्य सांगड घालणारे सनातनचे साधक

सनातन धर्म हाच सत्य धर्म आहे. त्या धर्माचे खरे धर्मपीठ आणि त्या धर्मातील तत्त्वांचे माहेरघर असलेल्या सनातन आश्रमाला मला भेट देता येणे, हे माझे परमभाग्य होय. समाजात हिंदुत्ववादी, धर्मप्रचारक, कीर्तनकार, प्रवचनकार, पंडित अशी विविध मंडळी आहेत. त्यांच्याबरोबर मी अनेक वर्षे काम केले; परंतु धर्माचे शास्त्रशुद्ध आचरण करणारे सनातनचे साधक प्रथमच मी पाहिले. धर्म आणि विज्ञान यांची यथायोग्य सांगड सनातनच्या साधकांनी घातली आहे. येथे संगणकाला साधक देवता समजून नमस्कार करतांना मी पाहिले, यावरून त्यांची धर्माचरणाची पद्धत लक्षात येते. ग्रंथ-प्रकाशन सोहळ्याच्या वेळी पुस्तकाचे प्रकाशन कसे करावे, याचे शास्त्र सांगितले गेले. धर्मातील शास्त्रही तसे सर्वांनी शिकण्याची आवश्यकता आहे. सनातनचे हे कार्य पाहून मी भारावलो असून कायमचा सनातनचा झालो आहे ! – पंचनिर्मोही आखाड्याचे महंत श्री अमृतदास जोशी महाराज, केंद्रीय संघटक, अखिल भारतीय वारकरी मंडळ धर्मपरिषद (१९.७.२००७)