
नवी देहली – राजधानी देहलीतील ‘भारत मंडपम्’ मध्ये १३ ते १४ डिसेंबर या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा एका मोठ्या राष्ट्रकार्याचा आरंभ आहे, असे प्रतिपादन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी एका व्हिडिओद्वारे केले.
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव में सहभागी होकर इसे भव्य और सफल बनाएं !
— अधिवक्ता @Vishnu_Jain1, सर्वोच्च न्यायालय तथा अध्यक्ष हिन्दू फ्रंट फॉर जस्टिस, दिल्लीसेव कल्चर सेव भारत फाउंडेशन प्रस्तुत
☀️ सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव️ 13-15 दिसंबर 2025
भारत मंडपम्, इंद्रप्रस्थ… pic.twitter.com/ZWFWd4tfPP— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) November 26, 2025
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये धर्माभिमानी हिंदूंना सहभागी होण्याचे आवाहन करतांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले, ‘‘या महोत्सवाचा मुख्य विषय ‘सनातन राष्ट्र’ हा आहे. ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेच्या दिशेने एक निर्णायक पाऊल म्हणून या कार्यक्रमाचा शंखनाद केला जात आहे. या ३ दिवसीय महोत्सवात सनातन राष्ट्राच्या स्थापनेसाठी भविष्यात कोणती कार्यदिशा निश्चित करायची ?, यावर विस्तृत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने सनातन संस्कृतीची सुरक्षा आणि सनातन भारताची सुरक्षा यांवर विचारमंथन होणार आहे. त्यामुळे सनातन राष्ट्र संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होऊन तो यशस्वी करावा, असे मी आवाहन करतो.’’
८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !
Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !
Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !
Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर