केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसह अन्य मान्यवरांना निमंत्रण

देहली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांना नवी देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, भारताचे माजी माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि श्री. चेतन राजहंस अन् हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्याचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले.
यासह सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी महाराणा प्रताप यांचे वंशज श्री. लक्ष्यराज सिंह यांची राजस्थानमधील उदयपूर येथे भेट घेऊन त्यांना सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण दिले.

राजस्थानचे उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री श्री. कृष्ण कुमार विश्नोई यांना सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) स्वाती मोदी आणि श्री. हनुमान विश्नोई यांनी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण दिले.

देहली येथील भाजपच्या आमदार शिखा रॉय यांची सनातनच्या साधिका सौ. मंजुळा कपूर आणि श्री. हरीश कपूर यांना सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण दिले.

नवी देहली – देहली येथे १३ आणि १४ या दिवशी होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला विविध राज्यांतील मान्यवर आणि महनीय व्यक्ती उपस्थित रहाणार आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे.



उज्जैन (मध्यप्रदेश) शहराचे महापौर श्री. मुकेश टटवाल यांची भेट घेऊन हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे आणि श्री. संजय घाटगे यांनी महोत्सवाचे निमंत्रण दिले. मध्यप्रदेशचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री श्री. विश्वास सारंग यांना श्री. श्रीराम काणे आणि सनातन संस्थेच्या सौ. संध्या आगरकर यांनी निमंत्रण दिले. फरीदाबाद (हरियाणा) महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. अनिल नागर यांना सनातन संस्थेच्या श्रीमती सरोज गुप्ता आणि सौ. तृप्ती जोशी यांनी निमंत्रण दिले. वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील ‘रामनगर इंडस्ट्रियल’मधील उद्योजक श्री. निखिल अग्रवाल यांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी यांनी निमंत्रण दिले.
‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’चे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र गोयंका आणि देहलीचे आमदार करनैल सिंह यांना निमंत्रण

नवी देहली – ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’चे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष आणि वाराणसी येथील सुप्रसिद्ध उद्योजक श्री. राजेंद्र गोयंका यांना देहली येथील शकूरबस्ती विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार करनैल सिंह यांना देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी श्री. राजेंद्र गोयंका यांना निमंत्रण दिले. या वेळी समितीचे उत्तरप्रदेश अन् बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी हे उपस्थित होते.
आमदार करनैल सिंह यांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी निमंत्रण दिले. आमदार करनैल सिंह हे भाजपच्या ‘मंदिर प्रकोष्ठ’चे संयोजक आहेत. ‘यामध्ये जोडलेल्या सर्व मंदिरांच्या विश्वस्तांना सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण पाठवीन’, असे आश्वासन या वेळी आमदार करनैल सिंह यांनी दिले.
देहलीतील कडकडडूमा जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या २५ अधिवक्त्यांना निमंत्रण !

देहली – येथील कडकडडूमा जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या २५ अधिवक्त्यांना देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण देण्यात आले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी अधिवक्त्यांच्या बैठकीत या महोत्सवाविषयी माहिती दिली. अधिवक्ता अवनीश शुक्ला यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या महोत्सवात सहभागी होणार असल्याचे बैठकीला उपस्थित असलेल्या अधिवक्त्यांनी सांगितले.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना निमंत्रण

रायपूर (छत्तीसगड) – २७ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड समन्वयक श्री. हेमंत कानस्कर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय घरवापसी अभियानाचे प्रमुख श्री. प्रबल प्रताप जुदेव आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. कमल बिस्वाल यांनी छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांची भेट घेऊन त्यांना देहली येथे होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण दिले.
Honourable Chief Minister of Chhattisgarh Shri Vishnu Deo Sai granted an audience to Shri Kamal Biswal and Shri Hemant Kanaskar, during which he was gifted a copy of the latest issue of Sanatan Prabhat Hindi periodical and Sanatan Almanac.
An invitation to the Sanatan Rashtra… pic.twitter.com/uprAs4jXpA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 27, 2025

या वेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना वर्ष २०२६ चे सनातन पंचांग, सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ‘सनातन प्रभात’चे हिंदी पाक्षिक भेट देण्यात आले.
गोव्याचे सामाजिक कल्याण आणि नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांना निमंत्रण !

गोवा – गोव्याचे सामाजिक कल्याण आणि नदी परिवहन मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांना नवी देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले. ३० नोव्हेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या सौ. सुप्रिया नाडकर्णी आणि श्री. नारायण नाडकर्णी यांनी श्री. सुभाष फळदेसाई यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले.

नवी देहली – देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी विविध राज्यांतील आणि क्षेत्रांतील महनीय व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील सुप्रसिद्ध ‘भारत मंडपम्’मध्ये हा महोत्सव होणार आहे.
सनातन संस्थेच्या सौ. शुभ्रा भार्गव, श्रीमती अर्चना खेमका आणि आशा राठी यांनी राजस्थानचे शिक्षणमंत्री श्री. मदन दिलावर यांची भेट घेऊन त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले. हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी भीलवाडा (राजस्थान) येथील आमदार आणि गोसेवक श्री. अशोक कोठारी यांची भेट घेऊन त्यांना सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण दिले. या वेळी सनातनच्या साधिका सौ. शुभ्रा मोदी आणि सौ. कल्पना काबरा उपस्थित होत्या. सनातन संस्थेच्या साधिका सौ. मंजुळा कपूर यांनी देहलीचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. परवेश साहिब सिंह वर्मा यांची भेट घेऊन त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि सुदर्शन न्यूज वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. सुधांशू त्रिवेदी यांची भेट घेऊन त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले.




नवी देहली – भाजपच्या खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, मध्यप्रदेशचे नगरविकास मंत्री कैलास विजयवर्गीय आणि हिंदू रक्षण संघटनेचे संयोजक एकलव्यसिंह गौड यांना देहली येथे होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले. १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी देहली येथील ‘भारत मंडपम्’ येथे हा महोत्सव होणार आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, श्री. विनय पानवळकर आणि श्री. निरंजन चोडणकर यांनी खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले.
📢 Invitation to the Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav! 🚩
MP Prof. Dr. (Mrs.) Medha Kulkarni (@Medha_kulkarni) was invited to the Mahotsav, which will be held on 13–14 December at Bharat Mandapam, Indraprastha (Delhi).
🙏 The invitation was extended by @Ramesh_hjs (National… pic.twitter.com/lfG2GjgXCy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 8, 2025
हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे, सनातन संस्थेचे श्री. बेनीसिंह रघुवंशी आणि धर्मप्रेमी श्री. अक्षय मित्तल यांनी श्री. कैलास विजयवर्गीय यांची भेट घेऊन त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले. या वेळी श्री. कैलास विजयवर्गीय यांनी ‘महोत्सवाला उपस्थित राहू, तसेच त्यासाठी सहकार्य करू’, असे सांगितले. श्री. एकलव्यसिंह गौड यांना श्री. श्रीराम काणे, सनातनच्या साधिका सौ. पुष्पा सावंत, श्री. बेनीसिंह रघुवंशी आणि धर्मप्रेमी श्री. अशोक महाशब्दे यांनी महोत्सवाचे निमंत्रण दिले.



पनवेल – भाजपचे पनवेल तालुका आमदार प्रशांत ठाकूर यांना देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे. सनातन संस्थेच्या सौ. नीला गडकरी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील शिंदे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले. त्या वेळी त्यांनी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला शुभेच्छा दिल्या, तसेच ‘देहली येथे हिवाळी अधिवेशनकाळात मी तेथे असणार आहे. त्या वेळी नक्की उपस्थित राहीन’, असे आश्वासन दिले.



८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !
Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !
Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !
Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर