
नवी देहली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना २३ नोव्हेंबर या दिवशी देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले. या वेळी त्यांच्या समवेत जौनपूर येथील आमदार डॉ. आर्.के. पटेल, तसेच हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश अन् बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी महोत्सवाला उपस्थित रहाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या वेळी योगी आदित्यनाथजी यांना हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान’, ‘लव्ह जिहाद’, ‘धर्माचे आचरण आणि रक्षण’, ‘धर्मांतर आणि धर्मांतरितांचे शुद्धीकरण’ हे हिंदी भाषेतील ग्रंथ भेट देण्यात आले. ग्रंथ पाहून मुख्यमंत्र्यांनी ‘धर्मप्रसारासाठी चांगले प्रयत्न करत आहात’, अशा शब्दांत समितीच्या कार्याचे कौतुक केले. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी या वेळी योगी आदित्यनाथजी यांना गोवा येथील सनातनच्या आश्रमात भेट देण्याचे निमंत्रण दिले.
Sanatan Rashtra Shankhnaad Mahotsav – Special Invite to UP CM Yogi Adityanath
CM Yogi was presented the 2026 ‘Sanatan Almanac’, which he praised wholeheartedly. ✨@myogiadityanath :
“As conversions & Love Jihad incidents grow, Hindutva organisations must strengthen… pic.twitter.com/D16ykFJ1h0— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 24, 2025
सनातनच्या पंचांगाचे कौतुक !
या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वर्ष २०२६ चे ‘सनातन पंचांग’ भेट देण्यात आले. ‘सनातन पंचांग’ पाहिल्यानंतर त्यांनी पंचांगाचे कौतुक केले.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तळागाळात जाऊन धर्मप्रसार करणे आवश्यक ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तरप्रदेशयाप्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘हिंदूंचे धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हिंदु धर्मावरील हे आघात थांबवणे आवश्यक आहे. यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी समाजात तळागाळात जाऊन धर्माचा प्रसार करणे आवश्यक आहे. हिंदूंना संघटित करणे आवश्यक आहे.’’ |
८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !
Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !
Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !
Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर