उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला उपस्थित रहाण्याचे आश्वासन !

उत्तराखंड – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी महोत्सवाला उपस्थित राहून ‘समान नागरी कायद्या’विषयी लोकांना संबोधित करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी उपस्थित असलेले डेहरादूनचे आमदार श्री. उमेश शर्मा काऊ यांनी गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची भव्यता सांगून धामी यांना देहली येथे होणार्या महोत्सवाला उपस्थित रहाण्याची नम्र विनंती केली.
Uttarakhand CM Pushkar Singh Dhami (@pushkardhami) invited to ‘Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav’!
Sadguru Dr. Charudatta Pingale (@hjsdrpingale) National Guide @HinduJagrutiOrg and Shri Chetan Rajhans (@1chetanrajhans) National Spokesperson @SanatanSanstha met the… pic.twitter.com/GHpUwuE3By
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 13, 2025
या प्रसंगी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी मुख्यमंत्री धामी यांना १३ ते १५ डिसेंबर या काळात महोत्सवस्थळी लावण्यात येणार्या शस्त्रास्त्र प्रदर्शनाची माहिती दिली, तसेच हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२६’ भेट दिले.
डेहराडूनचे आमदार श्री. उमेश शर्मा काऊ आणि सहसपूरचे आमदार श्री. सहदेव सिंह पुंडीर यांनाही निमंत्रण


जळगाव येथील विविध मान्यवरांना निमंत्रण

जळगाव – १. देशाच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांना भेटून देहली महोत्सवाचे निमंत्रण सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी दिले. या वेळी त्यांना ‘सनातन पंचांग २०२६’ भेट देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर हेही उपस्थित होते.
२. जळगाव येथील भाजपच्या खासदार श्रीमती स्मिता वाघ यांना देहली महोत्सवाचे निमंत्रण सनातन संस्थेचे सर्वश्री दत्तात्रेय वाघुळदे आणि वसंत पाटील यांनी दिले.
३. राज्यसभेचे खासदार आणि प्रथितयश अधिवक्ता उज्ज्वल निकम यांना श्री. प्रशांत जुवेकर आणि श्री. दिलीप पोळ यांनी निमंत्रण दिले.


प.पू. श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांना निमंत्रण

फोंडा – श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे मठाधीश प.पू. श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांना १४ नोव्हेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. संगम बोरकर आणि श्री. सुरजित माथूर यांनी स्वामीजी यांना सनातनचे कार्य आणि सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव यांविषयी माहिती दिली.
छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांना निमंत्रण

नवी देहली – ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि संस्कृतीरक्षण’ या उद्देशांनी सनातन संस्थेच्या वतीने १३ अन् १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील ‘भारत मंडपम्’ येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे निमंत्रण हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड समन्वयक श्री. हेमंत कानस्कर यांनी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री श्री. विजय शर्मा यांना दिले. या प्रसंगी सर्वश्री देवराज साहू, गोविंद साहू, रोशन साहू आणि प्रतीक रिझवानी हे मान्यवर उपस्थित होते.
‘द जयपूर डायलॉग्ज’चे अध्यक्ष संजय दीक्षित यांना निमंत्रण !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘द जयपूर डायलॉग्ज’चे अध्यक्ष श्री. संजय दीक्षित यांना देहली येथे होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण दिले.
बंगाल येथील स्वामी विश्वात्मानंदजी यांना निमंत्रण

बंगाल येथील भारत सेवाश्रम संघाचे महासचिव स्वामी विश्वात्मानंदजी (दिलीप महाराज) यांनाही महोत्सवाचे निमंत्रण हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी दिले. या प्रसंगी समितीचे श्री. विमल जयसवाल, तसेच ‘भारतीय साधक समाज’चे संस्थापक सचिव श्री. अनिर्बान नियोगी हेही उपस्थित होते. गोव्यात झालेल्या शंखनाद महोत्सवाचा व्हिडिओ पाहून स्वामीजी यांनी या वेळी उत्स्फूर्तपणे म्हटले की, आपण माझ्या गुरूंचेच कार्य करत आहात. आपणास पुष्कळ आशीर्वाद !
‘जागरण न्यूज मीडिया’च्या राजकीय संपादिका (पोलिटिकल एडिटर) स्मृती रस्तोगी यांना निमंत्रण

अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी या महोत्सवाचे निमंत्रण ‘जागरण न्यूज मीडिया’च्या राजकीय संपादिका (पोलिटिकल एडिटर) स्मृती रस्तोगी यांना दिले. यावर रस्तोगी यांनी या महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे आश्वासन दिले.
Advocate @SachdevaAmita extends an invitation to @SmritiRastogi_ Political Editor at Jagran News Media (@JagranNewMedia), for the upcoming ‘Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav’ in Delhi.
13–14 December
Bharat Mandapam, Delhi
Theme: National Security & Cultural… pic.twitter.com/5OSJbAOGJv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 17, 2025
विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केले देहलीत होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे आवाहन !

नवी देहली, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – विविध क्षेत्रांत राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांनी समस्त धर्मप्रेमी हिंदूंना देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या कालावधीत होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे आवाहन व्हिडिओद्वारे केले आहे.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ सनातन संस्कृतीच्या तेजाचा अविस्मरणीय उत्सव ठरेल – कर्नल (नि.)मोहन काकतीकर, मुख्य कार्यवाह, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती, नवी देहली
देहली येथे होणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आपला वैभवशाली इतिहास आणि सनातन संस्कृती यांच्या तेजाचा अविस्मरणीय उत्सव ठरणार आहे. या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील अद्वितीय शस्त्रांचे प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन भारतीय शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमान यांचे प्रतीक ठरेल. सनातन धर्माच्या अखंड तेजाची जपणूक करण्यासाठी, तसेच तरूण पिढीत राष्ट्राभिमान आणि संस्कार जागवण्यासाठी प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त राष्ट्र आणि हिंदु धर्म प्रेमींनी या ऐतिहासिक महोत्सवात सहभागी व्हावे.
सांस्कृतीक चेतनेचे पुनर्जागरण घडवून आणणारे भव्य आंदोलन ! – उदय साहाय, सेवानिवृत्त भारतीय पोलीस अधिकारी
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ एक उत्सव नाही, तर संपूर्ण देशात आपल्या सांस्कृतिक चेतनेचे पुनर्जागरण घडवून आणणारे एक भव्य आंदोलन आहे. या महोत्सवाच्या आयोजनाशी माझा निकटचा संबंध असल्याचा मला अपार अभिमान वाटतो. या महोत्सवात राष्ट्र आणि अंतर्गत सुरक्षा, यांवर आधारित सांस्कृतिक दृष्टीकोनातून चर्चासत्रे होणार आहेत. बुद्धीजीवींच्या विचारविनिमयासाठी आणि राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरेल. सर्वांनी या भव्य उपक्रमात सहभागी होऊन योगदान द्यावे, असे मी आवाहन करतो.
राजधानीतून संपूर्ण विश्वाला सनातन राष्ट्राचा दिव्य संदेश जाईल ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन वृत्तवाहिनी

हा महोत्सव देशाच्या राजधानीतून संपूर्ण विश्वाला सनातन राष्ट्राचा दिव्य संदेश देईल. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भवानी तलवार, तसेच अनेक ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शनही आहे. राष्ट्र आणि हिंदु धर्म प्रेमी यांनी स्वत:च्या परिवारासह या ऐतिहासिक महोत्सवाला उपस्थित रहावे.
इंद्रप्रस्थ (दिल्ली) में सनातन संस्था द्वारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ का आयोजन १३ एवं १४ दिसंबर २०२५ को किया जा रहा है. यह महोत्सव देश की राजधानी से पूरे विश्व को सनातन राष्ट्र के उद्घोष का संदेश देगा. इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज द्वारा उपयोग में लाई गई पवित्र ‘भवानी… pic.twitter.com/a0jjSnDLgq
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) November 1, 2025
गीता प्रेसचे मुख्य विश्वस्त श्रीकृष्ण खेमका यांना निमंत्रण !![]() लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धार्मिक ग्रंथ प्रकाशित करणार्या भारतातील सुप्रसिद्ध अशा ‘गीता प्रेस’चे मुख्य विश्वस्त तथा मासिक ‘कल्याण पत्रिका’चे सहसंपादक श्री. श्रीकृष्ण कुमार खेमका यांना देहलीतील ‘भारत मंडपम्’मध्ये १३ आणि १४ डिसेंबर २०२५ या दिवशी होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी हे निमंत्रण दिले. या वेळी समितीचे श्री. राजन केशरी उपस्थित होते. |
रांची (झारखंड) येथील विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत रायपत यांना निमंत्रण

नवी देहली – विश्व हिंदु परिषदेचे झारखंडमधील रांची येथील अध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत यांना देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी आमंत्रित करण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले. या प्रसंगी सनातनचे संत पू. प्रदीप खेमका, पू. (सौ.) सुनीता खेमका, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारे उपस्थित होते.
#Shankhnad_Mahotsav_Delhi – Delhi
Chandrakant Raypat, President of VHP (Ranchi), has been formally invited to the grand Shankhnad Mahotsav in Delhi.
Shrichitshakti (Mrs) Anjali Mukul Gadgil, spiritual successor of Sanatan Sanstha’s founder Sachchidananda Parabrahman (Dr)… pic.twitter.com/ciC7JheKgK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 20, 2025
Eminent Personalities Appeal to Attend the #Shankhnad_Mahotsav_Delhi in Delhi
“From the Capital, the message of Sanatan Rashtra will reach the world.”
– @SureshChavhanke, Chief Editor, @SudarshanNewsTV✨ “The Mahotsav will be a memorable celebration of Sanatan’s… pic.twitter.com/xVKN4uqdHH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 20, 2025
राजस्थान येथील ‘संस्कृती युवा संस्थे’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांना निमंत्रण

जयपूर (राजस्थान) – येथील ‘संस्कृती युवा संस्थे’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि ‘सर्व ब्राह्मण महासभे’चे संस्थापक पंडित सुरेश मिश्रा यांना देहली येथे १३ अन् १४ डिसेंबर या दिवशी होत असलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी पंडित मिश्रा यांची भेट घेऊन त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले.
आनंद आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित श्री श्री १००८ श्री स्वामी बालकानंदगिरीजी महाराज यांना निमंत्रण

नवी देहली – ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि संस्कृतीरक्षण’ या उद्देशांनी सनातन संस्थेच्या वतीने १३ अन् १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील ‘भारत मंडपम्’ येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे निमंत्रण हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी आनंद आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित श्री श्री १००८ श्री स्वामी बालकानंदगिरीजी महाराज यांना दिले. या वेळी सुदर्शन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके उपस्थित होते. यासह बालकानंदगिरीजी महाराज यांना ‘सनातन पंचाग २०२६’ही भेट देण्यात आले.

विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. आलोक कुमार यांना निमंत्रण !
श्री. रमेश शिंदे यांनी या शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. आलोक कुमार यांनाही दिले. या वेळी महामंडलेश्वर श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज हेही उपस्थित होते.

८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !
Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !
Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !
Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर