
नवी देहली – सनातन राष्ट्राचे पुर्नवैभव प्राप्त करणे, त्यासाठी सांस्कृतिक वारसा जपणे आणि टिकवणे, तसेच राष्ट्राची सुरक्षा आदी विविध विषयांवर चर्चेद्वारे पथदर्शन निश्चित करण्यासाठी देहली येथील ‘भारत मंडपम्’ येथे सनातन संस्थेच्या वतीने १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संतगणांसह विविध क्षेत्रातील महनीय व्यक्ती, राष्ट्र, धर्म आणि हिंदुत्व यांसाठी कर्तव्यभावनेने कार्यरत असलेले राष्ट्र-धर्मप्रेमी या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत. या महोत्सवाचे विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात येणार आहे.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या मालिकेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यापूर्वी मे महिन्यात गोव्यात झालेल्या अशाच भव्य महोत्सवाला २३ देशांमधून ३० सहस्रांहून अधिक साधक आणि धर्मप्रेमी यांनी उपस्थिती लावली होती. देहलीतील या ३ दिवसांच्या महोत्सवात देशभरातील संत-महात्मे, धर्माचार्य, विद्वान, सामाजिक कार्यकर्ते आणि युवावर्ग सहभागी होणार आहेत. या वेळी सुरक्षा, संस्कार आणि शौर्य यांसारख्या विषयांवर विचारमंथन होईल. या महोत्सवासाठी श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, देहलीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा, महाराष्ट्रातील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’चे संस्थापक श्री. उदय माहूरकर, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन आणि ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांची प्रमुख उपस्थिती असेल. यासमवेतच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचीही वंदनीय उपस्थिती लाभणार आहे.
१३ डिसेंबर या दिवशी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने नक्षलवाद आणि आतंकवाद या समस्यांविषयी मार्गदर्शन, तसेच सनातन संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन आदी विषयांवर विविध क्षेत्रांतील मान्यवर विचार मांडणार आहेत.
महोत्सवाचे वैशिष्ट्य
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भवानी तलवारीचे दर्शन, तसेच त्यांच्या काळात वापरण्यात आलेल्या विविध शस्त्रांचे प्रदर्शन, हे या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर यांनी ‘या प्रदर्शनाला समस्त राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी भेट द्यावी’, असे आवाहन केले आहे.
Invitations extended for the ‘Sanatan Rashtra Shankhanad Mahotsav’ in Delhi this December!@DattaHosabale (Sarkaryavaha, RSS) and @blsanthosh (National General Secretary, BJP) were invited by Sadguru Dr. Pingale ji (@hjsdrpingale), National Guide @HinduJagrutiOrg, and… pic.twitter.com/yBXYFrsHRR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 3, 2025




श्रीरामलल्लाची मूर्ती बनवणारे शिल्पकार अरुण योगीराज यांना देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण

मैसुरु (कर्नाटक) : देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण श्रीरामलल्लाची भावविभोर मूर्ती बनवणारे शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांना देण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी नुकतीच श्रीरामलल्लाची मूर्ती बनवणारे मैसुरू येथील शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांच्या मूर्तीशाळेत जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विशेष निमंत्रण दिले. श्री. अरुण योगीराज यांनीही देहली येथील महोत्सवात उपस्थित रहाण्याची इच्छा दर्शवली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, म्हणजेच २१ ऑक्टोबर या दिवशी श्री. अरुण योगीराज आणि त्यांची पत्नी सौ. विजेता यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे आशीर्वाद घेतले अन् या वेळी त्यांनी त्यांची मूर्तीशाळा दाखवली.
या प्रसंगी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री. अरुण योगीराज यांच्याशी बोलतांना श्रीरामाची मूर्ती बनवतांना त्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती यांविषयी मुलाखत घेतली.
कोट्यवधी भारतियांच्या आकांक्षांना आकार देणारे अरुण योगीराज !
|

कोटा (राजस्थान) – ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि संस्कृतीरक्षण’ या उद्देशांनी सनातन संस्थेच्या वतीने १३ अन् १४ डिसेंबर २०२५ या दिवशी देहलीतील ‘भारत मंडपम्’ येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे निमंत्रण हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश, तसेच राजस्थान या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया आणि विष्णुकांत शर्मा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना निमंत्रण दिले.
Delhi to host the Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav – Invitation extended to Shri Om Birla ji!@Anand_J25 from @HinduJagrutiOrg met Lok Sabha Speaker Shri @ombirlakota ji and invited him to the upcoming national-level event in Delhi. ️
The Mahotsav aims to promote… pic.twitter.com/1ONlEzeaRR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 7, 2025
याप्रसंगी श्री. जाखोटिया यांनी लोकसभा अध्यक्षांना महोत्सवाची माहिती देतांना सांगितले की, हा कार्यक्रम राष्ट्र, समाज आणि धर्म जागृती यांच्या उद्देशाने अखिल भारतीय उपक्रम म्हणून आयोजित केला जात आहे. या महोत्सवात देशभरातील धार्मिक नेते, विचारवंत आणि हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती सहभागी होतील. या महोत्सवात सांस्कृतिक संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा आणि सनातन राष्ट्र यांवर चर्चा होईल.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनाही निमंत्रण

देहली येथे होणार्या महोत्सवाचे श्री. श्रीकांत चासकर यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराज अहीर यांनाही निमंत्रण दिले.

नवी देहली, ८ नोव्हेंबर (वार्ता.) –
१. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेऊन त्यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सावा’चे निमंत्रण दिले.

२. हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्यांचे समन्वयक श्री. शंभू गवारे आणि ‘भारत जागरण परिषदे’चे संस्थापक श्री. अंकित कोठारी यांनी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले.


३. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष श्री. राजीव खांडेकर आणि ‘एबीपी न्यूज’च्या डिजिटल विभागाचे प्रमुख तुषार बनर्जी यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले.

४. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी देहली येथील‘ छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती’चे मुख्य कार्यवाह कर्नल मोहन काकटीकर (निवृत्त) यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रण

पणजी – सनातन संस्थेच्या वतीने १३ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत नवी देहली येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. भारत मंडपम्मधील सभागृह क्रमांक १२ मध्ये होणार्या या महोत्सवासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी उपस्थितीविषयी सकारात्मकता दर्शवली आहे. फर्मागुडी, फोंडा, गोवा येथे मे २०२५ मध्ये झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सक्रीय उपस्थिती होती आणि गोवा शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा अन् अन्य प्रकारचे साहाय्य महोत्सवासाठी करण्यात आले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रण देतांना सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे, साधक श्री. नारायण नाडकर्णी, श्री. धनंजय हर्षे आणि श्री. महावीर श्रीश्रीमाळ हे उपस्थित होते.

८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !
Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !
Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !
Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर