सनातन संस्थेच्या वतीने गिरगाव आणि चेंबूर येथे प्रवचन !

मुंबई – नवरात्री निमित्त गिरगाव येथील ‘चित्पावन ब्राह्मण सेवा संघा’च्या कार्यालयात २५ सप्टेंबर या दिवशी आणि चेंबूर येथे ‘बाल विकास सेवा संघा’च्या कार्यालयात २६ सप्टेंबर या दिवशी ‘शारदीय नवरात्रोत्सव’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. गिरगाव येथे सौ. भक्ती गैलाड यांनी आणि चेंबूर येथे भगिनी सेवा मंडळ आणि बालविकास संघ, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्रोत्सवात सौ. धनश्री केळशीकर यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले.

नवरात्रीचे महत्त्व काय ?, श्री दुर्गादेवीचा नापजप कसा करावा ?, कुंकूमार्चन कसे करावे ?, देवीची ओटी कशी भरावी ?, कुमारिका पुजन का करतात ?, नवरात्रीत अखंड दीप का तेवत ठेवतात ? अशा नवरात्रातील अनेक कृतींविषयी मार्गदर्शन या वेळी करण्यात आले. प्रवचनानंतर महिलांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

– चित्पावन ब्राह्मण सेवा संघ गिरगाव येथे प्रवचनाला उपस्थित महिला

प्रवचनाच्या आयोजनात गिरगाव येथे भाजपच्या महिला आघाडी प्रमुख सौ. अनघा बेडेकर यांचे आणि चेंबूर येथे सरोज स्वीट्सच्या सौ. मनीषा मराठे यांचे सहकार्य लाभले.

‘धर्माचे कार्य आपण सर्वांनी संघटित होऊन केले पाहिजे. हिंदु धर्माची मूल्ये आपण आपल्या पुढच्या पिढीला दिली पाहिजेत. या प्रवचनाच्या माध्यमातून सनातन संस्थेच्या कार्यात सहभाग घेता आला, त्यासाठी कृतज्ञ आहे.’ – सौ. मनीषा मराठे, उद्योजिका, सरोज स्वीट्स

Leave a Comment