दक्षिण भारतातील कुंभमेळा महामहम महोत्सवाचा इतिहास

Mahamaham_2016_Festival
कावेरी नदीच्या काठावर वसलेल्या कुंभेश्‍वर मंदिरात महामहमसाठी जमलेले भाविक

 

महामहमचा इतिहास

लोक आपली पापे धुण्यासाठी गंगा, यमुना, सरस्वती, शरयु, गोदावरी, महानदी, नर्मदा, कावेरी आणि पायोश्‍नी या नद्यांमध्ये स्नान करत. त्यामुळे या नद्यांचे पाप वाढले. त्या पापापासून मुक्त होण्यासाठी सर्व नद्या ब्रह्मदेवाकडे गेल्या. ब्रह्मदेवाने नद्यांची पापे धुण्यासाठी त्यांना एकत्रितरीत्या कुंभकोणमच्या तलावात स्नान करण्यास सांगितले. तेव्हापासून या महोत्सवाला आरंभ झाला.

 

काय आहे महामहम महोत्सव ?

महामहम महोत्सव प्रत्येकी १२ वर्षांनी येतो. मागचा महामहम महोत्सव २०१६ मध्ये साजरा करण्यात आला होता.

या महोत्सवाच्या वेळी देशातील सर्व महत्त्वाच्या नद्या कुंभकोणमच्या तलावात एकत्र येतात, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. त्यामुळे या काळात तलावात केलेल्या स्नानाचे फळ सर्व नद्यांमध्ये केलेल्या स्नानाच्या एकत्रित फळाइतके मिळते.

महामहम महोत्सवाचा शेवटचा दिवस सर्वांत विशेष समजला जातो; कारण या दिवशी कुंभकोणममधील सर्व मंदिरांच्या देवतांच्या मूर्तींना तलावात स्नान घालण्यात येते. या दिवशी लाखो हिंदू तलावात स्नान करतात. याला तीर्थावरी असे म्हणतात.

या दिवशी केलेल्या स्नानाने पापांचे हरण होते, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. स्नानानंतर देवतांना अर्पणस्वरूपात धन अथवा भेटवस्तू दिल्या जातात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात