बेंगळुरू येथील भारतीय संत महापरिषदेत सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. रामानंद गौडा सहभागी !

बेंगळुरू येथे १ सहस्र संतांच्या उपस्थितीत पार पडली भारतीय संत महापरिषद !

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती स्वामी, पू. गोविंददेव गिरि आदींची उपस्थिती

परिषदेला उपस्थित संत

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे १६ जून या दिवशी भारतीय संत महापरिषदच्या वतीने साधू-संतांची बैठक पार पडली. हिंदु धर्मावरील आघातांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि हिंदु मुलांना हिंदु धर्माचे शिक्षण देण्यासाठी भारतभरातील १ सहस्राहून अधिक संत या बैठकीत एकत्र आले होते.

या बैठकीत चित्रकूटचे स्वामी रामभद्राचार्य, कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती स्वामी, पू. गोविंददेव गिरि, रामचंद्रपूर मठाचे राघवेश्‍वर स्वामी, सूत्तूरचे देशिकेंद्र स्वामी, हरिहरपूर मठाचे स्वयंप्रकाश सच्चिदानंद स्वामी, कैलास आश्रमाचे जयेंद्रपुरी महास्वामी, आदिचुनचनगिरीचे निर्मालानंद महास्वामी आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. रामानंद गौडा यांनीही भाग घेतला होता. यासोबतच जपान, अमेरिका या देशांतील बौद्ध आणि जैन संतांनी यात भाग घेतला होता.

Leave a Comment