गोव्यात एखाद्या धार्मिक संस्थेकडून भव्य आणि नेत्रदीपक आयोजन प्रथमच !

डॉ. सच्चिदानंद शेवडे

गोव्यात सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ३ दिवस ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन. देशभरातून २५ सहस्र साधकांची, अन्य २३ देशांतून आलेले १५० हून अधिक साधकांची, संत-महात्म्यांची, व्याख्याते, लेखक आणि राष्ट्रहितेच्छुक यांची मांदियाळी. ३ मोठे मंडप, उत्तम न्याहरी आणि भोजन व्यवस्था, जागोजागी साहाय्यासाठी तत्पर साधक. अनेक परिसंवाद आणि सर्व साधकांचे पथदर्शक असलेल्या प.पू. डॉ. आठवले यांचे मुख्य भाषण अशी कार्यक्रमांची रेलचेल. एकीकडे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, तर दुसरीकडे मार्ग आणि कक्ष यांना दिलेली ऋषी अन् देवता यांची नावे. वरुण राजा अधेमध्ये थोडीफार उपस्थिती लावून जात असे !

१८ मे या दिवशी दुपारनंतर ‘सनातन धर्मश्री’ आणि ‘हिंदु राष्ट्र रत्न’ पुरस्कारांचे प.पू. डॉ. आठवले यांच्या हस्ते वितरण झाले. त्यात आम्हाला ‘हिंदु राष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थाप्रमुख, संस्था, साधक या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !

गोव्यात एखाद्या धार्मिक क्षेत्रातील संस्थेच्या कार्यक्रमाचे एवढे भव्य आणि नेत्रदीपक आयोजन प्रथमच झाले असावे !!

– डॉ. सच्चिदानंद शेवडे (भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचे ज्येष्ठ पुत्र), हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१९.५.२०२५)

Leave a Comment