छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा चरित्र ग्रंथ भेट !

भाजपचे छत्तीसगड येथील नेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी घेतली सदिच्छा भेट

मुख्यमंत्री विष्णुदेव साय (उजवीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव

रायपूर (छत्तीसगड) – राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना ‘विश्वकल्याणार्थ हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे संक्षिप्त चरित्र’ हा नुकताच प्रकाशित झालेला हिंदी भाषेतील ग्रंथ भेट देण्यात आला.

भाजपचे छत्तीसगड येथील नेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी मुख्यमंत्री साय यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी हा ग्रंथ भेट दिला.

Leave a Comment