सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव यांनिमित्त ३ दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन !
देशविदेशांतून २५ सहस्र, तर पुणे जिल्ह्यातून २ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित रहाणार !

पुणे – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या दोन्हींचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच २५ सहस्रांहून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल. या महोत्सवासाठी पुणे जिल्ह्यातून २ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदू आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती सनातनचे साधक श्री. चैतन्य तागडे यांनी श्रमिक पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ येथे ६ मे या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, ‘श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान कडेपठार’चे विश्वस्त अधिवक्ता मंगेश जेजुरीकर, ‘श्री क्षेत्र रांजणगाव गणपति देवस्थान ट्रस्ट’चे सचिव डॉ. तुषार पाचुंदकर पाटील, पुणे शहर भाजपच्या महिला मोर्चा महामंत्री सौ. उज्ज्वला गौड, ‘चिंतामणी प्रासादीक दिंडी तुकाराम महाराज पालखी सोहळ्या’चे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
महोत्सवाला वंदनीय आणि महनीय व्यक्तींना निमंत्रण
या महोत्सवाला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर, ‘पतंजलि योगपिठा’चे संस्थापक प.पू. योगऋषि स्वामी रामदेव, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूर महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय, तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे अधिवक्ता विष्णु जैन आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.
संतांच्या पादुकांचे दर्शन !
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज (इंदूर), समर्थ रामदासस्वामी, श्रीधरस्वामी, श्री कानिफनाथ स्वामी, प.पू. टेंबेस्वामी, समर्थ शिष्य श्री कल्याणस्वामी, श्री साईबाबा, संत वेणाबाई, श्री सिद्धारूढस्वामी (हुबळी), प.पू. गगनगिरी महाराज, प.पू. गोंदवलेकर महाराज आदी १० हून अधिक संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ सर्वांना घेता येणार आहे. १९ मे या दिवशी विश्वकल्याणार्थ त्याचप्रमाणे सनातन धर्मीयांच्या आरोग्यासाठी ‘महाधन्वंतरी यज्ञ’ होणार असल्याचेही तागडे यांनी सांगितले.
‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे १ कोटी श्रीरामनामाचा जप
‘सनातन राष्ट्रा’साठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे १ कोटी श्रीरामनामाचा जप करण्यात येणार असून १०० शंखांचा शंखनाद, संत सभा, पादुका दर्शन सोहळा, महाधन्वंन्तरी यज्ञ हे महोत्सवामध्ये होणार असल्याची माहिती श्री. चैतन्य तागडे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातून महोत्सवासाठी जाणारे संत-महंत, तसेच विशेष मान्यवर !
या भव्य-दिव्य महोत्सवासाठी पुणे जिल्ह्यातून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान’चे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज ह.भ.प. माणिक महाराज मोरे, ‘जय शंकर प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश उपाख्य पप्पाजी पुराणिक, ‘श्री क्षेत्र रांजणगाव गणपति देवस्थान ट्रस्ट’चे सचिव डॉ. तुषार पाचुंदकर पाटील, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, पुणे शहर भाजपच्या महिला मोर्चा महामंत्री सौ. उज्ज्वला गौड, विंग कमांडर शशिकांत ओक, प्रसिद्ध लेखक अभिजित जोग, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल आदींसह ५० हून अधिक प्रतिष्ठित मान्यवर येणार आहेत.
भारतामध्ये गोवा राज्याचे गोसेवेसाठी सर्वांत मोठे योगदान ! – शेखर मुंदडा
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोग, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून सहभागी होणार आहे. भारतामध्ये गोवा राज्याचे गो-सेवेसाठी सर्वांत मोठे योगदान दिले आहे. गोमाता संस्कृतीचा आत्मा आहे. त्यामुळे सप्त परिक्रमा पूर्ण होईल अशा पद्धतीने भव्य गोमंडप उभारणार आहे.
‘अध्यात्मशास्त्र आणि साधना’ हा विषय अनिवार्य करावा ! – डॉ. तुषार पाचुंदकर पाटील
गोवा येथे होणार्या महोत्सवामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून सहभागी होणार असून ‘अध्यात्मशास्त्र आणि साधना’ हा विषय सरकारने शालेय शिक्षणामध्ये अनिवार्य करावा, अशी मागणी डॉ. तुषार पाचुंदकर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
हा महोत्सव म्हणजे राष्ट्राच्या उन्नतीसाठी चाललेला मोठा यज्ञ आहे ! – अधिवक्ता मंगेश जेजुरीकर
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सर्व कार्यकर्ते गोव्यातील महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. गोवा राज्याला धार्मिक परंपरा आणि इतिहास लाभला आहे. हा महोत्सव म्हणजे राष्ट्राच्या उन्नतीसाठी चाललेला मोठा यज्ञ आहे. सर्वांनी धार्मिक परंपरा टिकवण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे. या महोत्सवामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
सकारात्मक ऊर्जेने युवा पिढी सनातन धर्माकडे आकर्षित होईल ! – सौ. उज्ज्वला गौड
गोवा येथे होणार्या महोत्सवातून मोठी ऊर्जा प्राप्त होणार आहे. या सकारात्मक ऊर्जेमुळे युवा पिढी सनातन धर्माकडे आकर्षित होईल. सनातन धर्माचा पगडा वाढून पाश्चात्य संस्कृतीचा र्हास व्हावा, यासाठी हा महोत्सव आहे. हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी हा यज्ञ आहे. त्यामुळे हिंदुत्वाचे कार्य करण्याची ऊर्जा घेण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे.
जगाला सुख मिळावे यासाठी गोवा येथे यज्ञ ! – ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज
वारी करतांना होणारा आनंद गोव्यातील महोत्सवात सहभागी होऊन घेणार आहे. जगाला सुख मिळावे, यासाठी होणारा यज्ञ हे विशेष आकर्षण आहे.
‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कारांचे वितरण होणार ! – कु. क्रांती पेटकर
वर्षानुवर्षे सनातन धर्माच्या सेवेसाठी समर्पित होऊन विशेष कार्य करणार्या हिंदु वीरांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ हा जीवनगौरव पुरस्कार, तसेच धर्मासाठी लढणार्या धर्मरक्षकांना ‘सनातन धर्मश्री’ हा पुरस्कार वंदनीय संतांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या भव्य कार्यक्रमातून गोव्यामधील लोककलांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रे, सनातन संस्कृती, राष्ट्र, कला, आयुर्वेद, आध्यात्मिक वस्तू यांचे भव्य प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.
वैशिष्ट्यपूर्ण
१. सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमात २ वेळा मी जाऊन आलो आहे. सनातन संस्थेचे कार्य नि:स्वार्थपणे चालते, हे मी स्वतः अनुभवले आहे. – श्री. शेखर मुंदडा
२. १७ मे या दिनांकाची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत. – सौ. उज्वला गौड, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज

अमरावती – मी सनातन संस्थेशी मागील ४ – ५ वर्षांपासून जोडलेलो आहे. संस्थेच्या आध्यात्मिक कार्याविषयी लक्षात आल्यावर मी त्यात सक्रियपणे सहभागी झालो. सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला जाण्याची मलाही संधी मिळाली आहे. या महोत्सवाची निमंत्रणपत्रिका पाहिल्यावर त्याद्वारे सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ होणार आहे. ‘सनातन राष्ट्र’ संकल्पनेला आध्यात्मिक शक्ती मिळणार आहे. हा महोत्सव म्हणजे अनेक संतांचे मार्गदर्शन, नामजप, यज्ञ, संत परिषद असा आध्यात्मिक स्तरावरचा असल्यामुळे यातून सनातन संस्थेचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य समाजाला कळणार आहे, असे विधान महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य कोअर कमिटीचे पदाधिकारी श्री. अनुप जयस्वाल यांनी केले. शंखनाद महोत्सवानिमित्त येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्थेच्या साधिका सौ. संगीता जाधव, श्रीमती विभा चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. नीलेश टवलारे उपस्थित होते.
या महोत्सवाला अमरावती येथून श्री रुक्मिणी विदर्भ पीठाचे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्वर माऊली सरकार, शिवधारा आश्रमाचे प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज, योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव उपस्थित रहाणार आहेत.
मुंबई : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. २५ सहस्रांहून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती, हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल. भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानमधील ९ आतंकवादी तळांवर अत्यंत अचूक आणि निर्णायक ‘एअर स्ट्राइक’ करून ते उद्ध्वस्त केले. सनातन संस्थेच्या वतीने या निर्णायक सैन्य कारवाईचे आम्ही मन:पूर्वक स्वागत करतो. संपूर्ण हिंदु समाज हा भारतीय सैन्यासमवेत एकजुटीने उभा आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. सनानत संस्थेच्या वतीने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, विरार येथील ‘श्री जीवदानी देवी संस्थान’चे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर हे उपस्थित होते.

श्री. वर्तक पुढे म्हणाले की,
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे सनातन संस्था आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही देशात रामराज्य-स्वरूप ‘सनातन राष्ट्रा’साठी सामूहिक संकल्प केला आहे. याद्वारे सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदु संघटना यांच्यातील धर्मबंधुत्व अधिक दृढ होईल. सध्याच्या भारतासमोर उभ्या असलेल्या अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सनातन धर्म, त्याची मूल्ये आणि त्याचे रक्षण नितांत आवश्यक झाले आहे. एकूणच गो, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणार्या ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणारा भव्य लोकोत्सव धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित करणारा ठरेल.
Sanatan Sanstha welcomes the Indian Armed Forces’ decisive strike on 9 terror camps in Pakistan.
️ “This is not just a military operation—it is a Shankhnaad of national identity, self-respect & awakened Hindu resolve. The killing of 26 innocent Hindu pilgrims in Pahalgam was… pic.twitter.com/00KjoMIhKg
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) May 7, 2025
अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमा !
अंनिसचा कार्यकर्ता वेगळे नाव वापरून रायगड जिल्ह्यात रहात होता. यापूर्वीही अंनिसच्या कार्यकर्त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे वेगवेगळ्या प्रकरणातून लक्षात आले. यांच्या संस्थेचे अनेक घोटाळे आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा नक्षलवादी कार्यकर्ता श्री. प्रशांत कांबळे याला रायगड जिल्ह्यातून अटक…
⭕ अंनिसवर प्रशासक नेमावा आणि अंनिसची सखोल चौकशी करावी ! – @AbhayVartak, प्रवक्ता, सनातन संस्था pic.twitter.com/orjadj83Mb
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) May 7, 2025
त्यामुळे यांच्या संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी आम्ही करत आहोत, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी या वेळी केली.
अधिवक्ता घनश्याम उपाध्याय या वेळी म्हणाले, ‘‘सनातन शंखनाद महोत्सव अशा वेळी होत आहे की, राष्ट्र एका मोठ्या संकटातून जात आहे. गोवा येथे होणार्या सनातन राष्ट्र महोत्सवात सनातन राष्ट्राची उद्घोषणा होणार असून या महोत्सवात संत आणि सर्व चर्चा करून सनातन राष्ट्र स्थापित करण्याचा निर्धार करणार.’’
श्री. प्रदीप तेंडोलकर या वेळी म्हणाले, ‘‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने मंदिर विश्वस्त उपस्थित रहाणार आहेत. सध्या जगभरात अशांतीचे वातावरण आहे. त्यामुळे या अभूतपूर्व कार्यक्रमात विश्वशांतीसाठी हवन केले जाणार आहे.’’
मुंबईतून सहभागी होणारे मान्यवर
महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भारताचार्य सु.ग. शेवडे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई, मेढे (वसई) येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संस्थापक पू. भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, जैनमुनी विनम्रसागरजी महाराज, राष्ट्रीय व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर, प्रख्यात सर्जन आणि लेखक डॉ. अमित थडानी, मुंबादेवी देवस्थानचे प्रबंधक श्री. हेमंत जाधव, रायगड येथील शिवराज्याभिषेक सेवा समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पवार
या महोत्सवाला श्री श्री रविशंकरजी, प.पू. योगऋषि स्वामी रामदेवजी, प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी, पूज्यश्री देवकीनंदन ठाकूरजी महाराज, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथजी, काही राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच आमदार आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.
‘सनातन राष्ट्रा’साठी एक कोटीचा रामनाम जपयज्ञ आणि संतसभा, ‘हिंदु राष्ट्ररत्न’, ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार वितरण, लोककलेचे सादरीकरण आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, संतांच्या पादुकांचे दर्शन आणि महाधन्वंतरी यज्ञ आदी कार्यक्रम या अंतर्गत होतील. या कार्यक्रमाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://www.sanatanrashtrashankhnad.in/ संकेतस्थळाला भेट द्या !

कोल्हापूर, ८ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. या वेळी २५ सहस्र साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती असणार आहे, हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. या महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दीड सहस्रांहून अधिक हिंदू सहभागी होणार आहेत, अशी माहिती सनातन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिली. ते ८ मे या दिवशी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक डॉ. मानसिंग शिंदे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे जिल्हा संयोजक श्री. आनंदराव पवळ आणि श्री. नितीन काकडे, वीर शिवा काशीद यांचे वंशज आणि हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे पन्हाळा तालुका संयोजक श्री. आनंदराव काशीद, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र शिवाजी तोरस्कर, ‘आरोग्य भारती’च्या डॉ. अश्विनी माळकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारे पक्ष आणि हिंदु संघटना
या महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारत हिंदु महासभा, वारकरी संप्रदाय, हिंदु एकता आंदोलन, विश्व हिंदु परिषद, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्योजक आणि विविध भाविक उपस्थित रहाणार आहेत.