मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई – सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला उपस्थित रहाण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी नुकतीच श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. १७ ते १९ मे या कालावधीत गोवा येथील फोंडा येथील फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव साजरा होणार आहे. ‘या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहू’, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट आणि भाजपचे आमदार डॉ. परिणीत फुके उपस्थित होते.
८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !
Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !
Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !
Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर