सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
गोवा – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मदिवस आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव यांनिमित्त गोव्यात १७ ते १९ मे या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे निमंत्रण देशभरातील विविध मान्यवरांना देण्यात आले आहे.
अ. महोत्सवाच्या स्वागत समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी देहली येथे संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिले. त्यांनी महोत्सवाला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले. या वेळी श्री. कार्तिक साळुंके आणि श्री. श्रीराम लुकतुके उपस्थित होते.

आ. देहली येथे ‘सुदर्शन वाहिनी’चे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांना श्री. नरेंद्र सुर्वे आणि श्री. कार्तिक साळुंके यांनी निमंत्रण दिले. त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.

या मान्यवरांसह भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण देण्यात येत आहे.
अयोध्या येथील श्री गणेश्वरशास्त्री द्रविडगुरुजी यांना शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

सांगली – अयोध्या येथील रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढणारे श्री गणेश्वरशास्त्री द्रविडगुरुजी यांच्या हस्ते तासगाव (जिल्हा सांगली) येथे श्री दुर्गादेवी मंदिराचा कलशारोहण समारंभ पार पडला. त्या वेळी त्यांना सनातन संस्थेच्या साधकांनी १७ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत गोवा येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिले. या वेळी त्यांनी ‘१८ मे या दिवशी शंखनाद महोत्सवाला येणार आहे’, असे साधकांना सांगितले.
फोंडा, गोवा – सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सहभागी होऊन हिंदु राष्ट्राचा संकल्प करूया ! – आमदार टी. राजा सिंह
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’स तेलंगाणातील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार राजा सिंह यांच्याकडून शुभेच्छा !

भाग्यनगर – फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’स भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार राजा सिंह यांनी एका व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘‘सनातन संस्थेची स्थापना होऊन आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतातील १०० कोटी हिंदूंना जागृत करण्यासाठी सनातनकडून अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक राज्य आणि प्रत्येक जिल्हा यांमध्ये फिरून सनातनचे साधक हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचा आमच्या गुरुदेवांचा (सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा) संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी ते कार्यरत आहेत. सनातनने छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाच्या कार्याची ओळख समाजाला करून देण्याचा प्रयत्न केला आहे. सनातन संस्थेच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त १७ ते १९ मे असे तीन दिवस ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ या फार सुंदर कार्यक्रमाचे आयोजन गोव्यातील फोंडा येथे केले आहे. भारतभरातील अनेक संत, मुख्यमंत्री, जे हिंदुत्वासाठी कार्य करत आहेत, ते या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. मीही या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहे. हिंदुत्वासाठी काम करणार्या सर्वांनी या सुंदर कार्यक्रमात उपस्थित राहुया आणि हिंदु राष्ट्रासाठी जो संकल्प येथे करण्यात येणार आहे, त्यामध्ये सहभागी होऊया.’’
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मुळे गोव्याचा ऐतिहासिक, समृद्ध आणि सांस्कृतिक वारसा जगासमोर येईल ! – श्री. रोहन खंवटे, पर्यटनमंत्री, गोवा राज्य

पणजी (गोवा) – फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’स गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी एका व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘‘सनातन धर्म, नितीमत्ता आणि अध्यात्म यांना चालना देणारा देश समृद्ध होत असतो आणि त्याची पुढे भरभराटही होत असते. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सव सोहळा आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष यांच्या निमित्ताने फोंडा तालुक्यात फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पटांगणात १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. फोंडा तालुका हा एक ऐतिहासिक आणि अनेक पुरातन मंदिरांचा आध्यात्मिक वारसा लाभलेला एक तालुका आहे अन् अशा तालुक्यामध्ये हा महोत्सव होणे, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या महोत्सवाला अनेक आध्यात्मिक नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि विविध उद्योगक्षेत्रांतील व्यक्ती सहभागी होणार आहेत. विदेशातील हिंदुत्वनिष्ठ संघटनाही या महोत्सवात सहभागी होणार आहेत. हा महोत्सव म्हणजे सनातन धर्म टिकवण्यासाठी येणार्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी मार्ग दाखवणारे एक व्यासपीठ आहे. सनातन संस्था ही अध्यात्माविषयी मार्गदर्शन करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. गोवा सरकार आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सक्रीय आहे. गोव्यातील पर्यटन खात्याने समुदायांच्या सहभागाने समावेशक विकास साधून आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘एकादश तीर्थ सर्किट योजना’ कार्यान्वित केली आहे. याद्वारे पर्यटकांना समुद्रकिनार्यापलीकडील गोव्याची ओळख करून दिली जात आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे राज्यात आध्यात्मिक कार्यक्रमांमध्येही वाढ झाली आहे. सनातन धर्माला केंद्रस्थानी ठेवून आध्यात्मिक पर्यटनाला आणखीन चालना देण्याचा सुवर्णक्षण या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या आयोजनाच्या माध्यमातून आलेला आहे. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी मी सनातन संस्थेला शुभेच्छा देतो. या महोत्सवामुळे गोव्याचा ऐतिहासिक, समृद्ध आणि सांस्कृतिक वारसा जगासमोर येण्यास साहाय्य होणार आहे. ‘धर्मो रक्षति रक्षिता: !!’ म्हणजे धर्माचे रक्षण करणार्याचे धर्मच रक्षण करतो.’’