
पुणे, १८ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने १७ ते १९ मे या कालावधीत गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने श्री. दीपक आगवणे यांनी ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान देहू’चे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज देहूकर यांना या महोत्सवाचे निमंत्रण दिले. या वेळी ‘चिंतामणी प्रासादीक दिंडी’चे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, ’कडेपठार खंडोबा मंदिर जेजुरी’चे विश्वस्त अधिवक्ता मंगेश जेजुरीकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
या वेळी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज देहूकर म्हणाले की, सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ मोठे आहे. आजच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांसाठी आध्यात्मिक स्तरावर कार्य करणे पुष्कळ मोठी गोष्ट आहे. आम्ही या सनातन राष्ट्र शंखनाद सोहळ्यात आवर्जून सहभागी होणार आहोत.
रांजणगाव गणपति मंदिराच्या विश्वस्तांना निमंत्रण !

श्री क्षेत्र रांजणगाव गणपति देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ. ओंकार देव यांना सनातन संस्थेच्या वतीने निमंत्रण दिले. या वेळी श्री. कृष्णाजी पाटील, कु. क्रांती पेटकर, श्री. विनीत पाटील उपस्थित होते.
त्यांना महोत्सवाविषयी सविस्तर माहिती सांगितली आणि महोत्सवाचे महत्त्वही सांगितले. महोत्सवाविषयी ऐकल्यावर डॉ. देव म्हणाले, ‘‘आमच्या देवस्थानचे विश्वस्त नक्की या महोत्सवामध्ये सहभागी होतील. महोत्सवाची रूपरेषा पुष्कळ छान आहे. अशा कार्यक्रमाची सध्या आवश्यकता आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम आपण रांजणगाव येथेही घेऊ शकतो, त्यासाठी जे काही साहाय्य लागेल ते आपण करू.’’
मंदिराचे विश्वस्त श्री. तुषार पाचुंदकर पाटील हेही या वेळी उपस्थित होते. त्यांनी शिर्डी येथे झालेल्या मंदिर परिषद आणि अमरावती येथे झालेल्या मंदिर परिषद यांचे कौतुक केले.
काही लोकप्रतिनिधींनाही दिले निमंत्रण !
शिवसेनेचे खासदार श्री. श्रीरंग बारणे आणि भाजपचे नगरसेवक श्री. नामदेव ढाके यांना मागील आठवड्यात निमंत्रण दिले.
![]() |
![]() |
| खासदार श्री. श्रीरंग बारणे यांना निमंत्रण देतांना श्री. पराग गोखले (डावीकडे) | नगरसेवक श्री. नामदेव ढाके यांना निमंत्रण देतांना श्री. पराग गोखले (डावीकडे) |

पुणे – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यानिमित्ताने गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत होणार्या भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण पुणे येथे विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या मान्यवरांना देण्यात येत आहे. या अंतर्गत भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णीं, विश्व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख श्री. दादा वेदक, प्रसिद्ध बासरीवादक आणि महामहोपाध्याय पंडित पू. डॉ. केशव गिंडे, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित विकास कशाळकर यांना शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण दिले.
खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांचे सनातन संस्थेविषयीचे मनोगत आणि समाजाला केलेले आवाहन !
भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णीं यांना शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देऊन त्या करत असलेल्या कार्यासाठी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तसेच त्यांना सनातन संस्थेच्या २५ वर्षांतील कार्याविषयीची माहिती दिली. सनातन संस्थेचे कार्य ऐकल्यावर प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णीं म्हणाल्या की, सनातन संस्थेचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना या महोत्सवासाठी शुभेच्छा देते. ‘संघटन में शक्ती है ।’, या शक्तीचा आपण उपयोग करूया आणि आपले राष्ट्र पुन्हा एकदा मूळ सनातन विचारधारेवर आणण्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येण्याची आवश्यकता आहे. हे महान कार्य सनातन संस्थेच्या वतीने होत आहे.
![]() |
![]() |
| प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. विकास कशाळकर यांना निमंत्रण देतांना श्री. चैतन्य तागडे | प्रसिद्ध बासरीवादक, महामहोपाध्याय, पं.पू. डॉ. केशव गिंडे यांना निमंत्रण देतांना डॉ. ज्योती काळे |
![]() |
![]() |
| प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. संजय गरुड यांना निमंत्रण देतांना डॉ. ज्योती काळे | विश्व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख श्री. दादा वेदक यांना निमंत्रण देतांना (डावीकडे) श्री. कृष्णाजी पाटील, श्री. बाळकृष्ण घोरपडे |
या कार्यासाठी सर्वांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक, सामाजिक, राजकीय पाठबळ आवश्यक आहे. अध्यात्म, राजकीय क्षेत्र, तसेच आपापल्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी उत्तुंग असे कार्य केलेले आहे, अशी अनेक मान्यवर मंडळी येथे येणार आहेत. आपल्या सगळ्यांशी चर्चा, विचारविनिमय करणार आहेत. यासाठी आपण सर्व हिंदु बांधवांनी या महोत्सवाला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग देऊया.’’






८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !
Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !
Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !
Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर