
पणजी (गोवा) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फर्मागुडी, फोंडा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या SanatanRashtraShankhnad.in या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्वरी येथील मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आले.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी संकेतस्थळाचे अवलोकन केले, तसेच कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘स्वागत समिती’तील पू. पृथ्वीराज हजारे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच श्री. नारायण नाडकर्णी, श्री. मधुसूदन कुलकर्णी आणि अधिवक्ता राजेश गावकर असे उपस्थित होते.
Official website of Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav launched by Goa CM @DrPramodPSawant, in the presence of an esteemed delegation led by H.H. Prithviraj Hazare, @1chetanrajhans & @Ramesh_hjs
CM explored the site & extended his best wishes
https://t.co/9OqLRlOeTF… pic.twitter.com/HXn4wzSQnE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 17, 2025

या संकेतस्थळावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे, ज्यात सध्या सनातन राष्ट्राचा उद्देश; सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय यांचा समावेश आहे. महोत्सवाच्या दृष्टीने वेळोवेळी या संकेस्थळावर अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यासह सनातन संस्थेच्या वतीने या महोत्सवासाठी (Sanatan.org/donate) धर्मदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Hon’ble Chief Minister @DrPramodPSawant met with representatives of Sanatan Sanstha to discuss on Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav to be held from 17th to 19th May 2025 at Ponda in presence of Senior Govt officials. 1/2 pic.twitter.com/nJk1A3ts9y
— CMO Goa (@goacm) April 17, 2025
८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !
Shankhnad Mahotsav Delhi : कोल्हापूर येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’च्या युद्धकलेने जागवले शौर्य !
Shankhnad Mahotsav Delhi : हिंदूंनो, रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्या क्षमतेनुसार अधिकाधिक योगदान द्या !
दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर !
Shankhnad Mahotsav Delhi : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या इंग्रजी भाषेतील सनातन...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘सुरक्षा, संस्कृति आणि शौर्य’ यांचा जागर