‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे देहलीचे कला आणि संस्कृती मंत्री कपिल मिश्रा यांना निमंत्रण !

डावीकडून श्री. कार्तिक साळुंखे, श्री. कपिल मिश्रा आणि श्री. श्रीराम लुकतुके

गांधीनगर (गुजरात) – सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे देहलीचे कला आणि संस्कृती मंत्री श्री. कपिल मिश्रा यांना निमंत्रण देण्यात आले. हे  निमंत्रण देण्यासाठी सनातन संस्थेचे श्री. कार्तिक साळुंखे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांनी श्री. मिश्रा यांची नुकतेच भेट घेतली.  सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ वा जन्मोत्सव यांच्या निमित्ताने १७ ते १९ मे या कालावधीत फोंडा, गोवा येथील फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात हा महोत्सव साजरा होणार आहे.

Leave a Comment