‘आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन !

पुणे – विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी प्रथम सत्र परीक्षेच्या ‘ओपन डे’च्या निमित्ताने पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. जयश्री काळे यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या, तसेच विविध प्रश्न विचारून त्यांनी स्वत:च्या शंकांचे निरसन करून घेतले.
सौ. जयश्री काळे यांनी सांगितले की, सध्या बहुतेकांचे दैनंदिन जीवन हे धावपळ आणि चिंता यांनी ग्रासलेले आहे, मनःशांती हरवली आहे. ताणतणाव हा आयुष्याचाच एक भाग झाला आहे. शाळेत जाणारे अगदी लहान मूल असू दे किंवा कुणी वयोवृद्ध असू दे, आज प्रत्येकालाच दैनंदिन जीवनात ताणतणावाचा सामना करावा लागतो. आपण शिक्षण घेतांना इतिहास, भूगोल, गणित असे विषय शिकतो; पण आनंद कसा मिळवायचा ?, हे कुठेच शिकवले जात नाही. हे सर्व साधनेने शक्य होत असून परिस्थितीवर मात करण्यासाठी साधनाच करायला हवी. आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे अध्यात्म !
‘हा कार्यक्रम पुष्कळ चांगला होता. मार्गदर्शनानुसार कृती करण्याचा प्रयत्न करू’, असे मत काहींनी व्यक्त केले.
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !