तंजावूर, तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी यांनी सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टर यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

प.पू. रामभाऊस्वामी
प.पू. रामभाऊस्वामी

तंजावूर, तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात १५ ते १७.१.२०१६ या कालावधीत उच्छिष्ट गणपति यज्ञ करण्यात आला. प.पू. रामभाऊस्वामी यांनी सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टर यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार पुढे देत आहोत.

१. ‘मी ज्याप्रमाणे माझे गुरु आणि समर्थ रामदासस्वामी यांना विसरू शकत नाही, त्याचप्रमाणे प.पू. डॉ. आठवले यांनाही आता विसरू शकणार नाही. हे तिघे माझ्यासाठी ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्याप्रमाणे आहेत.

२. प.पू. डॉ. आठवले यांची प्राणशक्ती अल्प असते. त्यामुळे त्यांना चालणेही कठीण होते. मी त्यांच्यासाठी यज्ञ करणार आहे. या यज्ञातून त्यांना केवळ चालण्याचीच नव्हे, तर धावण्यासाठीही शक्ती मिळेल !

३. मी यापुढे ज्या ज्या ठिकाणी यज्ञ करीन, त्या प्रत्येक यज्ञाच्या वेळी सनातनसाठी प्रार्थना करीन.

४. मी आतापर्यंत अनेक ठिकाणी यज्ञ केले आहेत. एरव्ही यज्ञ करतांना अग्नी प्रज्वलित होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; मात्र रामनाथी येथील आश्रमात केलेले यज्ञ वैशिष्ट्यपूर्ण होते. या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करतांना प्रयत्न करावे लागले नाहीत. यज्ञाच्या तीनही दिवशी सहजरित्या आपोआप यज्ञ प्रज्वलित झाला. अशी अनुभूती अन्य ठिकाणी केलेल्या एकाही यज्ञाच्या वेळी आली नाही.

– श्री. दत्तात्रय रेठरेकर, सांगली (२२.१.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात