लहान मुलांसाठी वेखंडाचा उपयोग

Article also available in :

वैद्य परीक्षित शेवडे

​लहान मुला-मुलींच्या गळ्यात धागा बांधून त्याला छातीच्या पातळीवर येईल आणि शरिराला स्पर्श होईल, अशा प्रकारे वेखंडाचा तुकडा नीट घट्ट बांधून ठेवावा.

» त्याचा आकार तोंडात सहजासहजी जाऊ नये इतका असावा.

» त्या तुकड्याला बुरशी तर लागत नाही ना, याकडे मध्ये मध्ये लक्ष द्यावे.

» हा तुकडा ठराविक दिवसांनी नियमितपणे पालटावा.

​छाती हे कफाचे प्रमुख स्थान आहे. वेखंडासारख्या वनस्पती स्पर्शानेही काम करू शकत असल्याने आयुर्वेदात याला ‘औषधीधारण’ असे म्हटले आहे.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती, डोंबिवली.

Leave a Comment