सनातन प्रभात नियतकालिक समूहाचे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले

Article also available in :

अनुक्रमणिका

ppdr

‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून पत्रकारितेचे कार्य

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संदेश प्रसारित करण्यासाठी त्यांनी सनातन प्रभात नियतकालिके चालू केली. ते  सनातन प्रभात समूहाचे संस्थापक संपादक आहेत. ते २८ एप्रिल १९९८ ते १९ एप्रिल २००० या काळात संपादक होते. नंतर इतर सेवांमुळे त्यांनी संपादकपद साधकांकडे सोपवले. समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या हिताचा दृष्टीकोन देणार्‍या या नियतकालिकांतून प्रेरणा घेऊन अनेक जण राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य, तसेच साधनाही करू लागले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले संस्थापक संपादक असलेल्या सनातन प्रभात नियतकालिकांच्या समूहाच्या वतीने सध्या आर्थिक हानी सोसून मराठी दैनिक (मुंबई, गोवा, रत्नागिरी आणि पश्‍चिम महाराष्ट्र या ४ आवृत्त्या), मराठी अन् कन्नड साप्ताहिक, हिंदी अन् इंग्रजी पाक्षिक आणि गुजराती मासिक प्रकाशित केले जाते.

 

सनातनची पत्रकारिता या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचे मनोगत

आदि शंकराचार्यांनी समाजव्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक उन्नती होण्यासह पारलौकिक उन्नतीही होणे, या तीन गोष्टी साध्य करून देणार्‍यास धर्म असे म्हटले आहे. सध्या समाज गुंडगिरी, भ्रष्टाचार, अनीती आणि अकार्यक्षमता यांनी जर्जर झाला आहे. राज्यशासन असून नसल्यासारखे, तसेच त्रासदायक झाले आहे. त्यामुळे यावर उपाय योजणे आणि समाजपुरुषाला पुन्हा सुस्थित करणे, हे प्रत्येक धर्मनिष्ठाचे कर्तव्य बनते. प्रचलित पत्रकारितेमध्ये अनेक दुर्गुणांचा प्रादुर्भाव झाला आहे, असे अनेक मान्यवरांचे मत आहे. अनेक जण याला समाजातील एकूणच ढासळलेल्या नैतिक मूल्यांचे प्रतिबिंब मानतात. समाजमन घडवण्यात मोलाचा हातभार लावू शकणार्‍या या माध्यमाचीच क्षमता योग्य प्रकारे पुनर्स्थापित करणे, हे एकूण समाजव्यवस्था सुस्थित करण्याला धर्म मानणार्‍या साधकांचे प्रथम उद्दिष्ट ठरते. समाजातील वस्तुस्थितीची जाणीव, त्यामागील कार्यकारणभाव, त्यावरील उपाययोजना या गोष्टी समाजमनाला समजावणे, हा समाज सुस्थित करण्यातील पहिला टप्पा आहे. यासंदर्भात समाजातील वास्तव योग्य प्रकारे व्यक्तीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे ठरते. नियतकालिक हे या कार्यासाठीचे महत्त्वाचे माध्यम आहे.

संदर्भ : सनातनचा ग्रंथ सनातनची पत्रकारिता

ppdr_bhushandada

दैनिक सनातन प्रभातचा ४.४.१९९९ या दिवशी प्रसिद्ध झालेला प्रथम अंक पहातांना सनातन प्रभात समूहाचे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि बाजूला सहसंपादक श्री. भूषण केरकर (२०१५)

p-hazarekaka
एन्बीसी न्यूजमेकर्सने दिलेल्या उत्कृष्ट मराठी दैनिक २०१२ पुरस्कारासह माजी समूहसंपादक पू. पृथ्वीराज हजारे
ranekaka
२०१६ च्या वर्धापनदिन सोहळ्यात मार्गदर्शन करतांना समूहसंपादक श्री. शशिकांत राणे

सनातन प्रभातचे संस्थापक-संपादक !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संदेश प्रसारित करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एप्रिल १९९८ पासून सनातन प्रभात नियतकालिके चालू केली. समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या हिताचा दृष्टीकोन देणार्‍या या नियतकालिकांतून प्रेरणा घेऊन अनेक जण राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य, तसेच साधनाही करू लागले आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले संस्थापक संपादक असलेल्या सनातन प्रभात नियतकालिकांच्या समुहाच्या वतीने सध्या आर्थिक हानी सोसून मराठी दैनिक (मुंबई, गोवा, रत्नागिरी आणि पश्‍चिम महाराष्ट्र या ४ आवृत्त्या), मराठी अन् कन्नड साप्ताहिक, हिंदी अन् इंग्रजी पाक्षिक आणि गुजराती मासिक प्रकाशित केले जाते.

राष्ट्र अन् धर्म यांच्या जागृतीसाठी एकाच वेळी दैनिक, साप्ताहिक,
पाक्षिक आणि मासिक चालवणारे एकमेव संत परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातन प्रभात प्रकाशित करण्यामागील उद्देश

१. समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंमध्ये जागृती करणे

२. हिंदूंना धर्मशिक्षण देणे आणि धर्मद्रोही विचारांचे खंडण करणे

३. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक वैचारिक दिशा देणे

स्वभाषारक्षणाचे कार्य आणि भाषेच्या अलौकिक पैलूंविषयी संशोधन

स्वभाषाभिमानाविना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभाषारक्षण या ग्रंथमालिकेतून परकीय भाषांच्या तुलनेत मराठी, हिंदी आणि देवभाषा संस्कृत यांचे आध्यात्मिक श्रेष्ठत्व सांगितले.

अ. भाषाशुद्धीसाठी चळवळ

मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये घुसलेल्या इंग्रजी, उर्दू, फारसी या परकीय भाषांतील शब्दांचा वापर न करता स्वभाषेतील संस्कृतनिष्ठ प्रतिशब्द वापरावेत, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भाषाशुद्धीची चळवळ चालू केली. त्यांनी नगरे, वास्तू आदींनाही परकीय आक्रमकांची नावे असू नयेत, यासाठीही जनजागृती आरंभली. दैनिक सनातन प्रभातमधूनही परकीय शब्द आणि पर्यायी मराठी शब्द प्रतिदिन प्रसिद्ध केले जातात.

आ. भाषेच्या अलौकिक पैलूंविषयी संशोधन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृतोद्भव भारतीय भाषा आणि इंग्रजी यांचा व्यक्ती, पक्षी, प्राणी आदींवर होणारा परिणाम, संस्कृत भाषेमुळे होणारे आध्यात्मिक उपाय, देवनागरी लिपीची सात्त्विकता आदी भाषेच्या अलौकिक पैलूंविषयी संशोधन चालू आहे.

(सविस्तर माहिती सनातनच्या स्वभाषाभिमान वाढवणार्‍या ग्रंथमालिकेत दिली आहे.)

सनातन प्रभातच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये

१. प्रत्येक वृत्तासह दृष्टीकोनात्मक संपादकीय टीपणी देण्याची अभिनव पद्धत

सनातन प्रभातचे संपादक असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जगात घडणार्‍या विविध घटना, तसेच या वृत्तांशी संबंधित समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या दृष्टीकोनाची संपादकीय टीपणी देण्याची अभिनव पद्धत पहिल्या अंकापासून चालू केली. त्यामुळे प्रत्येक वृत्तासह संपादकीय दृष्टीकोन देणारे सनातन प्रभात हे जगातील एकमेव नियकालिक ठरले आहे.

२. वाचकांना कृतीशील बनवणारे लेखन

सनातन प्रभातमध्ये प्रकाशित केले जाणारे लेख अन् सदरे वाचक संख्या वाढावी, यासाठी नसतात, तर वाचकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी, तसेच त्यांना राष्ट्र अन् धर्म यांचे कार्य करण्यास दिशा मिळावी, यांसाठी असतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले(४.४.२०१७)

३. व्यंगचित्रे नव्हे, तर बोधचित्रे

सनातन प्रभातमध्ये प्रकाशित होणार्‍या बोधचित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मनोरंजनात्मक व्यंगचित्रांपेक्षा समाजाला राष्ट्र अन् धर्म हिताचा बोध देणार्‍या चित्रांची संकल्पना पत्रकारितेच्या जगतात प्रथमच रूढ केली.

४. केवळ वार्ता छापणारे नव्हे, तर वार्ता निर्माण करणारे वृत्तपत्र म्हणजे सनातन प्रभात !

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले(२०.३.१९९९)

सनातन प्रभात नियतकालिक समूहाच्या कार्यवृद्धीचा गोषवारा

१. मराठी साप्ताहिक सनातन प्रभात

२८.४.१९९८ या दिवशी मराठी साप्ताहिक सनातन प्रभातचा ८ पानी प्रथम अंक प्रकाशित झाला. तो आता नोव्हेंबर २०१५ पासून १६ पानी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. कन्नड पाक्षिक सनातन प्रभात (आताचे साप्ताहिक)

जुलै १९९८ मध्ये ८ पानी कन्नड पाक्षिक सनातन प्रभात चालू करण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर १९९९ मध्ये ८ पानी साप्ताहिक सनातन प्रभातच्या स्वरूपात ते प्रकाशित करण्यात येऊ लागले. ७ एप्रिल २०१६ पासून १६ पानी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

३. दैनिक सनातन प्रभात

एका वर्षात दैनिक सनातन प्रभातच्या ४ आवृत्त्या दैनिकाची गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्ती ४.४.१९९९ या दिवशी, रत्नागिरी आवृत्ती २८.११.१९९९ या दिवशी, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आवृत्ती ५.१२.१९९९ या दिवशी, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि उत्तर महाराष्ट्र आवृत्ती ५.३.२००० या दिवशी, अशा प्रकारे वर्षभराच्या कालावधीत दैनिकाच्या चार आवृत्त्या चालू करण्यात आल्या. प्रारंभी नियमित ४ आणि रविवारी ६ पानी असलेले दैनिक सध्या नियमित ८ पानी आणि रविवारी १० पानी प्रकाशित करण्यात येत आहे.

४. हिंदी मासिक सनातन प्रभात (आता पाक्षिक)

जानेवारी २००० मध्ये १६ पृष्ठांचे हिंदी मासिक सनातन प्रभात चालू झाले. जानेवारी २०१६ मासापासून ते पाक्षिक स्वरूपात प्रकाशित करण्यात येत आहे.

५. गुजराती मासिक सनातन प्रभात

मार्च २००० मध्ये १२ पृष्ठांचे गुजराती मासिक सनातन प्रभात चालू करण्यात आले.

६. इंग्रजी मासिक सनातन प्रभात (आता पाक्षिक)

एप्रिल २००६ मध्ये १२ पृष्ठांचे इंग्रजी मासिक सनातन प्रभात चालू करण्यात आले. जानेवारी २०१६ पासून ते पाक्षिक स्वरूपात प्रकाशित होऊ लागले आहे.

सनातन प्रभात ऑनलाईन आवृत्ती : SanatanPrabhat.Org

इंटरनेटवरील हिंदु वार्ता वृत्तवाहिनीचे संकल्पक

आघाडीच्या वृत्तवाहिन्या हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांच्या वार्ता प्रसारित करत नसल्याचे लक्षात घेऊन परात्पर गुरु डाॅ. आठवले यांनी इटंरनटेच्या माध्यमातून सनातन प्रभातमधील वृत्तांचे दृकश्राव्य स्वरूपात प्रसारण करण्याची संकल्पना मांडली. २९.१२.२०१४ ते २९.१.२०१६ असे १३ मास चाललेल्या या उपक्रमाद्वारे हिंदूंच्या वृत्तवाहिनीचा पाया रचला गेला.

दैनिक सनातन प्रभात चालू करतांना वितरकापासून संपादकीय विभागात सेवा करणार्‍या साधकांपर्यंत कुणालाही ना अनुभव होता, ना अभ्यास ! मात्र आमच्याबरोबर होता तो परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प आणि आशीर्वाद ! त्यामुळेच कोणतेही राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नसतांनाही सर्व संकटांना सामोरे जात तत्त्वनिष्ठपणे दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य चालू ठेवता आले. आमची कोणतीही पात्रता नसतांना सनातन प्रभातच्या माध्यमातून सेवेची अमूल्य संधी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला दिली. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडीच ! सनातन प्रभातच्या विचारांतून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्राचे स्वातंत्र्ययुद्ध लढणारे क्रांतीवीर निर्माण व्हावेत, ही सनातन प्रभातचे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना !

– सनातन प्रभात नियतकालिक समूहात सेवा करणारे सर्व साधक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात