चित्रपटाच्या दुसर्या भागातही अशीच मोडतोड आढळल्यास त्याच्या विरोधात देशभरात रस्त्यावर उतरू ! – श्री. अभय वर्तक

मुंबई – नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ चित्रपटात महर्षि वाल्मिकी लिखित मूळ रामायणातील अनेक प्रसंगांची ‘लेखनस्वातंत्र्या’च्या नावाखाली जाणीवपूर्वक पालट करण्यात आल्याविषयी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला.
रामायणावर आधारित चित्रपटांमध्ये मूळ ग्रंथातील प्रसंग जसेच्या तसे दाखवले पाहिजेत. ‘लेखनस्वातंत्र्या’च्या नावाखाली त्यात पालट करणे अयोग्य आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबई येथे १७ नोव्हेंबर २०२६ या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि मुंबई प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर हेही उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत चित्रपटातील रावणाचे अवाजवी उदात्तीकरण, अनेक प्रसंगांचा विपर्यास, लक्ष्मणाचे अवमूल्यन आणि प्रभु श्रीराम-लक्ष्मण यांच्या पराक्रमाचे विसंगत चित्रण, अशा अनेक संतापजनक अन् आक्षेपार्ह गोष्टींवर आक्षेप घेण्यात आले.
चित्रपटातील प्रमुख आक्षेप
१. रावण ‘शोषितांचा तारणहार’ कसा ? : ऋषिमुनींचे आश्रम नष्ट करणार्या पापी रावणाला चित्रपटात गरिबांना सोन्याची घरे देणारा ‘शोषितांचा तारणहार’ म्हणून रंगवले आहे. रावण हा राक्षसांचा राजा होता. राक्षस हे शोषित नसून अत्याचारी होते.
२. रावण ‘महिलांचा रक्षक’ कसा ? : अनेक महिलांवर अत्याचार केल्याने परस्त्रीला स्पर्श केल्यास भस्म होण्याचा शाप रावणाला मिळाला होता. एका दासीला छेडल्यामुळे शूर्पणखेचा पती विद्युतजिव्हाला मारत ‘महिलांच्या सन्मानाचा रक्षक’ म्हणून रावणाला दाखवण्यात आले आहे.
३. स्त्रीवादी विचारांना प्रोत्साहन ! : शूर्पणखा रामाकडे केवळ लग्नाचा प्रस्ताव घेऊन आली असून त्यावरून लक्ष्मणाने तिचे नाक कापल्याचे दाखवले आहे. त्याहून संतापजनक म्हणजे या प्रसंगानंतर चित्रपटात माता सीता लक्ष्मणाला ‘एका स्त्रीच्या रूपाचा भंग करण्याचा तुम्हाला अधिकार नाही’, असे खडसावते. जे रामायणात घडलेच नाही, ते उगाचच तथाकथित स्त्रीवादी चळवळीच्या भूमिकेचा प्रचार करण्यासाठी घुसडण्यात आले आहे.
४. श्रीरामाचा अवमान ! : खर-दूषण आणि त्यांचे १४ सहस्र राक्षस, तसेच ताडका यांच्याशी युद्ध करतांना श्रीराम अन् लक्ष्मण हे राक्षसांच्या सैन्यापासून पळतांना दाखवले आहेत. विष्णूचा अवतार असलेला राम आणि लक्ष्मण हे दोन्ही अजेय योद्धे होते. यातून रावणाचे उदात्तीकरण, तर रामाचा अवमानच करण्यात आला आहे.
५. त्याग आणि निष्ठा यांचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या लक्ष्मणाचा घोर अवमान ! : चित्रपटात लक्ष्मणाला सतत उद्धट, संतापी आणि विनोदी पात्राप्रमाणे संवाद करतांना दाखवले आहे. अत्यंत नम्र आणि निष्ठावान असलेल्या लक्ष्मणाला श्रीराम, भगवान परशुराम आणि अन्य पूजनीय ऋषी यांच्या समवेत उपरोधिक भाषेत बोलतांना दाखवले आहे. त्याग आणि निष्ठा यांचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या लक्ष्मणाला असे दाखवणे, ही धर्मग्रंथांत दिलेल्या ज्ञानाची केलेली मोडतोड अत्यंत संतापजनक आहे.
६. माता सीतेविषयीचा विरोधाभास ! : माता सीतेला इतर राक्षसांशी लढतांना दाखवले आहे; पण रावण जेव्हा तिचे अपहरण करतो, तेव्हा ती कोणताच प्रतिकार करत नाही, हा विरोधाभास आहे. माता सीता युद्ध करते, असा वाल्मिकी रामायणात कुठेही उल्लेख नाही.
७. सीता स्वयंवरातील रावणाच्या फजितीचा प्रसंग वगळला ! : माता सीतेच्या स्वयंवरात भगवान शिवांचे धनुष्य उचलण्यात रावणाला अपयश आले आणि त्यामुळे त्याची फजिती झाली, हा प्रसंग चित्रपटातून वगळण्यात आला आहे.
‘लेखनस्वातंत्र्या’च्या नावाखाली मूळ रामायणाची मोडतोड करणे अयोग्य ! – श्री. अभय वर्तक
श्री. अभय वर्तक म्हणाले की, रामायणावर आधारित चित्रपटांमध्ये मूळ ग्रंथात वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे दाखवले पाहिजेत. मात्र, या चित्रपटात मूळ रामायणातील अनेक प्रसंगांचा विपर्यास करण्यात आला आहे. हे अयोग्य आहे.
आज देशात रामभक्त पंतप्रधान आणि रामाला आदर्श मानणारे सरकार असतांना अशा कलाकृतींच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड होत असेल, तर ते दुर्दैवी आहे, असेही त्यांनी सांगितले.
…तर दुसर्या भागाच्या विरोधात देशभरात रस्त्यावर उतरू ! – सनातन संस्था
या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांच्या संदर्भात आम्ही निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्ड यांना सांगू इच्छितो की, या चित्रपटाप्रमाणेच त्याच्या दुसर्या भागातही मोडतोड झालेली आढळली, तर देशभरात रस्त्यावर उतरून या चित्रपटाला आम्ही कडाडून विरोध करू. दुसरा भाग प्रदर्शित होण्यापूर्वी यांनी हिंदु संत आणि ‘रामायणा’चे अभ्यासक असलेल्यांना चित्रपट दाखवून प्रदर्शित करावा, असेही आवाहन समस्त हिंदु संघटनांच्या वतीने करत असल्याचे श्री. अभय वर्तक यांनी या वेळी सांगितले.
‘रामभक्त सरकारनेही रामाची निंदा करणार्या चित्रपटाविषयी भूमिका घ्यावी’, असे आवाहनही सरकारला करण्यात आले आहे.
जयपूर येथे पार पडलेल्या श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती रथयात्रेच्या समारोप सोहळ्यात श्रीचितशक्ती (सौ.) अंजली गाडगीळ यांचा...
सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
नाशिक कुंभमेळ्याच्या भव्य धर्मध्वज नगर परिक्रमेचे सनातन संस्थेने केले स्वागत !
प.पू. समर्थ शिवानंद स्वामी महाराज (भीष्माचार्य) यांचे समाधीगमन !
दीपावलीनिमित्त SanatanShop.com वर २५ % पर्यंत विशेष सवलत !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...