अध्यात्म कृतीत आणा!
अध्यात्म जगा, आनंदी बना!
लेखात ज्या ठिकाणी '(टीप)' असे लिहिले असेल तेथे कर्सर न्यावा.


Google Groups
Subscribe to
Sanatan Sanstha
Email: Visit this group



वाचकांना विनंती !

१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असून चैतन्यदायी आहे. तिच्यातील चैतन्याचा लाभ वाचकांना व्हावा, यासाठी संकेतस्थळावर संस्कृत श्लोक / वचने देण्यात येतात. यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी त्या आम्हाला अवश्य कळवाव्यात.

२. संकेतस्थळावर संस्कृत वचने / श्लोक संदर्भासहित दिले आहेत. काही संस्कृत वचनांचे / श्लोकांचे संदर्भ मिळू शकले नाहीत, त्यांच्यापुढे कंसात ‘संदर्भ : अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यांचा संदर्भ ज्ञात असल्यास कृपया वाचकांनी तो कळवावा.

संगणकीय पत्ता : sanatan@sanatan.org




देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसे करावे ?

         देवीला कुंकुमार्चन करण्याच्या दोन पद्धती, कुंकुमार्चन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र आदींचा उहापोह या लेखात केला आहे. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रामुळे हा विषय वाचकांना समजून घेणे सोपे जाईल.


देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करतांना
देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करतांना


१. पद्धती

१ अ. पद्धत १

         ‘देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे.’ - ब्रह्मतत्त्व (टीप) ईश्‍वराची कृपा आणि प.पू. डॉ. जयंत आठवले यांची संकल्पशक्‍ती यांमुळे २००३ पासून सनातन संस्थेच्या काही साधकांना ज्ञानप्राप्ती होत आहे. ईश्‍वर गुरुतत्त्व, ब्रह्मतत्त्व, सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’, एक ज्ञानी इत्यादींच्या माध्यमातून ज्ञान देतो. (सौ. पाटील यांच्या माध्यमातून, २२.२.२००४, रात्री ९.३०)


१ आ. पद्धत २

         काही ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करतांना कुंकू केवळ चरणांवर वाहिले जाते.



२. शास्त्र

         ‘मूळ कार्यरत शक्‍तीतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असल्याने शक्‍तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्‍तीतत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणार्‍या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्‍तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्‍या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.’


- एक विद्वान (टीप) ईश्‍वराची कृपा आणि प.पू. डॉ. जयंत आठवले यांची संकल्पशक्‍ती यांमुळे २००३ पासून सनातन संस्थेच्या काही साधकांना ज्ञानप्राप्ती होत आहे. ईश्‍वर गुरुतत्त्व, ब्रह्मतत्त्व, सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’, एक ज्ञानी इत्यादींच्या माध्यमातून ज्ञान देतो. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.१०.२००५, रात्री ९.५३)



३. कुंकुमार्चन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

खालील सूक्ष्म-चित्र (टीप) चित्रांच्या स्वरूपात मांडले जाणारे ‘सूक्ष्म - परीक्षण’ म्हणजे ‘सूक्ष्म - चित्र’ सूक्ष्म-चित्राची स्पंदने त्रिमितीय असतात; परंतु त्रिमितीय स्पंदने चित्रात दाखवता येत नसल्याने ती द्विमितीय दिसतात, उदा. चैतन्याचा गोळा वर्तुळाकार किंवा वलयाच्या स्वरूपात दिसणे. मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !




४. कुंकुमार्चन केल्यामुळे आलेली अनुभूती (टीप) देवतेची उपासना करणार्‍याला भावाप्रमाणे त्या त्या टप्प्याला अनुभूती येते. अनुभूतीमुळे उपासकाची देवतेप्रती श्रद्धा वाढून त्याच्या साधनेत वृद्धी होण्यास साहाय्य होते. - कुंकुमार्चन केलेले कुंकू कपाळावर लावल्यावर प्रार्थना आणि नामजप चांगला होणे आणि उत्साह जाणवणे

         ‘२७.१.२००४ या दिवशी आम्ही देवळात कुंकुमार्चन करण्यासाठी गेलो होतो. आम्ही दिलेल्या कुंकवाने पुजार्‍यांनी दोन्ही मूर्तींचे अर्चन केले आणि त्यानंतर गार्‍हाणे घालून ते कुंकू आम्हाला दिले. कुंकू घेत असतांना मी देवीला प्रार्थना केली, ‘हे सातेरीदेवी, या कुंकवाने आम्हाला शक्‍ती मिळू दे, आमच्याकडून प्रार्थना आणि नामजप चांगला होऊ दे.’ त्या वेळेपासून जेव्हा जेव्हा मी ते कुंकू कपाळाला लावते, तेव्हा तेव्हा माझा नामजप चालू होतो आणि मला वेगळाच उत्साह जाणवतो.’ - सौ. रक्षंदा राजेश गावकर, फोंडा, गोवा.


संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र’


संबंधित लेख

» देवीपूजनाशी संबंधित उपासनेच्या काही कृती
» देवीची ओटी कशी भरावी ?
» देवाला हात जोडून नमस्कार कसा करावा ?
» करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी
» श्री महालक्ष्मीदेवीच्या देवळाची रचना आणि मूर्ती
» कोल्हापूर येथील
श्री महालक्ष्मी देवस्थानातील काही महत्त्वाचे उत्सव



Be first to comment

अभिप्राय

* आपला अभिप्राय मोडरेटरकडून तपासून येइपर्यंत वेळ लागू शकतो.
* कृपया अयोग्य शब्द टाळावे.
* URLs व संगणकीय पत्ता टाकण्यास प्रतिबंध आहे.
 
नाव :   लक्षात ठेवा ?: 
आपला संगणकीय पत्ता:   
शहर :
देश :
अभिप्राय:
You may enter 700 letters. Type in Marathi (Press Ctrl+m to toggle between English and Marathi)
Image Characters: