सनातनचे बालसंत

‘जगभरात आतापर्यंत जन्मतः ५० आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेली काही सहस्र बालके उच्च स्वर्गलोक, तसेच महर्लोक येथून पृथ्वीवर जन्माला आली आहेत. कर्नाटकातील मंगळुरू येथील जन्मतः ७१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले पू. भार्गवराम हे बालसंत जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आले आहेत. आता जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आले आहेत दुसरे बालसंत पू. वामन ! पुराणांत भक्त प्रल्हादसारख्या अनेक बालभक्तांच्या गोष्टी असतात. त्या आपण केवळ वाचतो. आपल्याला बालसंतांचे प्रत्यक्ष दर्शन घडवून ईश्‍वराने आपल्यावर मोठी कृपा केली आहे. त्याबद्दल आपण ईश्‍वराच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच ठरेल !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. भार्गवराम भरत प्रभु
पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर