योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सात्त्विक जीवनशैली आणि त्यांचे विविध गुण

योगतज्ञ दादाजी म्हणजे विविध गुणांची खाणच !  त्यांच्यातील प्रत्येक गुणाची असंख्य उदाहरणे सांगता येतील; पण त्यांतील केवळ काही उदाहरणे पुढे देत आहोत.

पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीमुळे भविष्यात वादळे होत रहाणार ! – डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ

अरबी समुद्र दिवसेंदिवस तापत आहे. पर्यावरणातील पालटांमुळे हा प्रकार चालू आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची वादळे येतच रहाणार, अशी चेतावणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी दिली आहे, असे वृत्त दैनिक तरुण भारतच्या सिंधुदुर्ग आवृत्तीत प्रसिद्ध झाले आहे.

२६.५.२०२१ या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण

वैशाख पौर्णिमा, २६.५.२०२१, बुधवार या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

सनातन संस्थेच्या ‘Survival Guide (आपत्कालीन सुरक्षा)’ या ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे लोकार्पण

सनातन संस्थेच्या ‘Survival Guide (आपत्कालीन सुरक्षा)’ या ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे १४ मेला अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते ‘ऑनलाईन सत्संगा’त लोकार्पण करण्यात आले.

साधनेची तीव्र तळमळ आणि ईश्‍वरावर दृढ श्रद्धा असल्याने दुर्धर आजारातही भावपूर्ण साधना करून ‘सनातनचे १०७ वे (समष्टी) संतपद’ प्राप्त करणारे अयोध्या येथील पू. डॉ. नंदकिशोर वेद (वय ६८ वर्षे) !

​वर्ष २००० पासून अयोध्या (फैजाबाद) येथे सनातन संस्थेचे कार्य चालू झाल्यावर डॉ. नंदकिशोर वेद यांनी तळमळीने सेवेला आरंभ केला. त्यांचा अहं मुळातच अल्प होता. त्यामुळे स्वतःच्या उच्च शिक्षणाचा किंवा प्रतिष्ठेचा कोणताही विचार न करता ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने ते सेवा करू लागले. त्यांचे निवासस्थान जणू साधकांसाठी आश्रमच बनले. अयोध्येत सनातनचे कार्य वाढावे, यासाठी त्यांनी सर्व स्तरांवर तळमळीने प्रयत्न केले.

काळ्या आणि पांढर्‍या बुरशीनंतर आता सापडला पिवळ्या बुरशीचा संसर्ग झालेला रुग्ण !

काळ्या आणि पांढऱ्या बुरशीनंतर आता देशात पिवळ्या बुरशीचा रुग्ण सापडला आहे. पिवळी बुरशी अधिक धोकादायक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. गाझियाबाद येथे सापडलेल्या पिवळ्या बुरशीच्या रुग्णावर सध्या उपचार चालू आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्रात औषधांची दुकाने, रुग्णालये आणि आधुनिक वैद्यांची चिकित्सालये अशा ५० हून अधिक ठिकाणी सनातन संस्था निर्मित देवतांच्या नामजपाचे ध्वनीमुद्रण लावल्यामुळे चांगले परिणाम लाभले !

सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सनातन संस्थेचे साधक आणि धर्मप्रेमी यांच्या प्रयत्नांनंतर औषधांची दुकाने, रुग्णालये आणि आधुनिक वैद्यांची चिकित्सालये अशा ५० हून अधिक ठिकाणी सनातनच्या वतीने सिद्ध केलेले देवतांच्या नामजपाचे ध्वनीमुद्रण लावण्यात आले. या नामजपातील चैतन्यामुळे तेथील वातावरणात पालट होत असल्याचे लक्षात येत आहे.

सनातनच्या आश्रमात ‘लॅपटॉप बॅग्ज’ यांची आवश्यकता !

सनातनच्या आश्रमांत विविध संगणकीय सेवांसाठी, तसेच धर्मप्रसाराच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये भ्रमणसंगणकांचा (‘लॅपटॉप’चा) वापर केला जातो. सध्या भ्रमणसंगणकांसाठी आवश्यक बॅग्ज ची संख्या अपुरी पडत असून पुढील प्रकारच्या ‘लॅपटॉप बॅग्ज’ यांची आवश्यकता आहे.

कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के !

पश्‍चिम महाराष्ट्रात २३ मे या दिवशी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. ‘रिश्टर स्केल’वर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

आध्यात्मिक त्रासामुळे साधकाच्या मनात येणारे आत्महत्येचे विचार साधनेमुळे नाहीसे होऊन त्याचे रक्षण होणे, याचे सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

साधक साधना करत असल्याने, तसेच त्याच्यात ईश्‍वराप्रती भाव असल्याने ईश्‍वराकडून त्याला चांगली शक्ती मिळते. त्यामुळे ‘आत्महत्येचा विचार हा माझा नसून वाईट शक्तीने माझ्या मनात घातला आहे’, हे त्याच्या लक्षात येते आणि साधक सतर्क होतो.