शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अद्वितीय व्यक्तीमत्त्वाचे त्यांच्या निकटवर्तियांनी, काही मान्यवरांनी आणि सनातनचे प्रवक्ता यांनी उलगडलेले पैलू

बाबासाहेब यांचे कर्तृत्व वादातीत होते. त्यांनी ‘शिवचरित्र’ ग्रंथाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जगासमोर मांडला. त्यांनी ‘जाणता राजा’ या महानाट्याची निर्मिती करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोचवला.