श्रीकृष्णासमवेत केलेल्या दैनंदिन कृती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे (भाग १)
कर्म, ध्यान, ज्ञान आणि भक्ती अशा कोणत्याही मार्गाने साधना करणार्या साधकाला नवजात बाळाप्रमाणे परमहंस अवस्था प्राप्त केल्याविना मोक्ष मिळत नाही.
कर्म, ध्यान, ज्ञान आणि भक्ती अशा कोणत्याही मार्गाने साधना करणार्या साधकाला नवजात बाळाप्रमाणे परमहंस अवस्था प्राप्त केल्याविना मोक्ष मिळत नाही.
माता-पिता, सखा, सर्वकाही असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या कोमल शेल्याला घट्ट धरून सर्व काही त्याच्या चरणी आधीन करून, तोच माझे रक्षण करणार आहे या दृढ, परिपूर्ण, शुद्ध श्रद्धेने साधिका झोपली आहे.
सतत श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवता यावे, यासाठी हे चित्र काढण्याची प्रेरणा मला आतून मिळाली. या चित्रात मी प्रत्यक्ष गोकुळात असून गोवर्धन पर्वतानजीक असलेल्या यमुना नदीत मी भगवान श्रीकृष्णासमवेत खेळत आहे.
श्रीकृष्णाने स्वतःकडे लक्ष द्यावे, यासाठी बालसाधिकेने रुसल्याचे नाटक करणे आणि श्रीकृष्णाने लाडीगोडी करत स्वतःचे ‘सुदर्शनचक्र’ अन् ‘पांचजन्य शंख’ देऊन तिची समजूत घालणे
‘उपास्यदेवतेची भक्ती कशी करायची, हे मला कळत नाही. मी लहान मुलगी पूजा-अर्चा करू शकत नाही’, असा बालिकेच्या मनातील शरणागतभाव ओळखून श्रीकृष्णाने तिच्यासाठी तिच्या उपास्यदेवतेला दुग्धाभिषेक केला.
हे श्रीकृष्णा, मी तुझ्या चरणी क्षमायाचना करत आहे. मी आतापर्यंत किती चुका केल्या, हे माझे मलाच ठाऊक नाही; परंतु तू सर्व काही जाणतोस. माझ्यासाठी माझे आई-वडील आणि गुरु असे सर्व काही तूच आहेस.
सर्वशक्तीमान आणि अजिंक्य असा माझा भगवंत माझ्यासाठी सर्वस्व असल्याने त्याला दुःख होत असलेले मी पाहू शकत नव्हते. त्यामुळे मी माझ्या इवल्या इवल्या हातांनी त्याची मान आणि खांदा यांठिकाणी मर्दन करू लागले.
बालगोपीला सेवाभावाचे बाळकडू पाजून भगवंताने तिच्यात दास्यभक्तीचा उदय केला आणि तिच्याकडून भक्तांची सेवा करवून घेतली.
साधिका बालकभावाच्या स्थितीत अडकलेली आहे आणि या स्थितीच्या पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी ती काहीच प्रयत्न करत नाही, हे श्रीकृष्णाने जाणल्यामुळे, तोच बालरूपामध्ये येऊन तिला पुढे घेऊन जात आहे.
सौ. उमा रविचंद्रन् यांनी साधनेला आरंभ करण्यापूर्वी आणि साधनेला आरंभ केल्यानंतर त्यांच्या स्थिती दर्शवणारे चित्र, त्याचे विवरण आणि विश्लेषण पाहूया.