सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल ! – रसिक पीठाधीश्वर महंत जन्मेजय शरण महाराज, बडास्थान (अयोध्या)
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल. रामजन्मभूमीतही राममंदिर उभे रहात आहे. राममंदिरासह रामराज्याची स्थापना होऊन सर्वांचे सार्थक होईल. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला माझ्या शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन बडास्थान (अयोध्या) येथील रसिक पीठाधीश्वर महंत जन्मेजय शरण महाराज यांनी केले. येथील चालू असलेल्या कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला त्यांनी भेट दिली.