‘हिंदु राष्ट्राचे आदर्श संघटक’ होण्यासाठी स्वतःमध्ये अर्जुनाप्रमाणे कृतज्ञताभाव निर्माण करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

स्वसुखांच्या पलिकडेही आपले जीवन आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात आता खारीचा वाटा नाही, तर सिंहाचा वाटा उचलण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो.

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ची तातडीने आवश्यकता !

रामनाथी आणि देवद येथील सनातन आश्रमामध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य नि:स्वार्थीपणे करणारे अनेक साधक रहातात. यातील काही रुग्ण साधकांसाठी वेळोवेळी ऑक्सिजनची आवश्यकता भासते. त्यामुळे आश्रमात एखाद्या रुग्ण साधकाला तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ असणे अत्यावश्यक आहे.

युवकांनो, आदर्श हिंदु संघटक बनण्यासाठी लहान वयातच साधना करून धर्माचे रक्षण करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोना संसर्गासह नैसर्गिक आपत्ती येण्यासही आता प्रारंभ झालेला आहे. यासमवेतच आपण तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोचलो आहोत. या भीषण आपत्काळात जीवंत रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. शिबिरात सहभागी झालेल्या युवकांना लहानपणापासूनच साधना समजली आहे, हे कौतुकास्पद आहे. अनेक संत आणि क्रांतीकारक यांनी लहान वयातच साधना करून धर्माचे रक्षण केले आहे, तसेच आपल्याला हिंदूसंघटन करायचे आहे.

मंगळ ग्रहाचा २ जून २०२१ या दिवशी होणारा कर्क राशीत प्रवेश आणि त्या कालावधीत होणारे परिणाम

‘बुधवार, २.६.२०२१ (वैशाख कृष्ण पक्ष अष्टमी) या दिवशी सकाळी ६.५१ वाजता मंगळ हा ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. (कर्क राशीतील मंगळ अशुभ (नीच राशीत) मानला आहे.) मंगळ हा ग्रह एका राशीत दीड मास रहातो. या दीड मासातील पहिल्या आठ दिवसांमध्ये अधिक परिणामकारक फळ मिळते.

हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन शॉप’ यांच्या पानांवर बंदी !

हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदू अधिवेशन’, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने फेसबूककडून बंद (अनपब्लिश) करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन शॉप’ यांची पाने पूर्णतः काढून टाकण्यात आली आहेत. याविषयीची कोणतीही कल्पना किंवा कारण फेसबूककडून हिंदु जनजागृती समिती किंवा सनातन प्रभात यांना देण्यात आलेले नाही.

साधकांनी नामजपादी उपायांना बसतांना पूर्वेकडे किंवा पश्‍चिमेकडे तोंड करून बसावे !

‘सनातनचे आश्रम, सेवाकेंद्रे किंवा साधकांची निवासस्थाने येथे साधक प्रतिदिन स्वतःवर नामजपादी उपाय होण्यासाठी बसतात. उपायांचा लाभ होण्यासाठी नामजपाला बसतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

प्रतिकूल परिस्थितीत देवाची कृपाच आपणास तारून नेऊ शकते, नामस्मरणाने मनोबल वाढते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

विशिष्ट पद्धतीने केलेला नामजप आपणास कोरोना महामारीच्या काळात आपले मनोबल वाढवू शकतो; मात्र या नामजपात सातत्य असणे आवश्यक आहे. याचसमवेत मन स्थिर ठेवण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकतो. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेअंतर्गत मनाला स्वयंसूचना दिल्याने मन स्थिर रहाण्यास साहाय्य होते, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता वैद्यकीय उपचारांसमवेत आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी ‘श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव’ या देवतांचा एकत्रित नामजप ध्वनीक्षेपकाद्वारे सर्वत्र लावण्याचे नियोजन करा !

‘नामजप हा केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक नसून तो विविध विकारांच्या निर्मूलनासाठीही लाभकारक ठरतो, हे सिद्ध झालेले आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी योगासने, प्राणायम, आयुर्वेदाचे उपचार इत्यादी प्रयत्न समाजातून होत आहेत. त्याबरोबर रोगप्रतिकारकशक्तीला पूरक असलेले आत्मबळवाढण्यासाठी साधनाच करावी लागते.

परात्पर गुरु डॉक्टर साधकांची प्रत्येक क्षणी आणि मृत्यूनंतरही काळजी घेणारच असल्याने साधकांनो, भक्तीभाव वाढवा !

साधकांना ‘पुढे येणार्‍या आपत्काळामध्ये आपले आणि आपल्या कुटुंबियांचे रक्षण कसे होणार ?’, अशासारख्या अनेक गोष्टींची काळजी असते. त्या वेळी साधक हे विसरतात की, ज्या देवाने आपल्याला जन्माला घातले आहे, तोच आपले रक्षण करणार आहे. आपण केवळ भगवंताच्या अनुसंधानात राहून भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सनातनची आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

‘वेद, उपनिषदे, पुराणे आदी धर्मग्रंथ गेली सहस्रो वर्षे मार्गदर्शन करत आहेत, तसेच सनातनचे ग्रंथ पुढे सहस्रो वर्षे मानवजातीला मार्गदर्शन करतील’, असा आशीर्वाद एका संतांनी दिला आहे.