भारतभरातील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेली कटरा (जम्मू) येथील श्री वैष्णोदेवी !
श्री वैष्णोदेवी मंदिर हिंदु धर्मियांसाठी एक पवित्र स्थळ आहे. श्री वैष्णोदेवीला ‘माता राणी’ म्हणूनही संबोधले जाते. जम्मू जिल्ह्यातील कटरा येथून १४ किलोमीटर चढण चढल्यानंतर एका डोंगरावर हे मंदिर आहे. अतिशय जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी देशभरातून लक्षावधी भाविक दर्शनाला येतात.