इंडोनेशियातील रहदारीच्या चौकांत रामायण आणि महाभारत काळातील पौराणिक कलाकृती, तसेच लोककलांमध्येही हिंदु पौराणिक कथांचा समावेश !

जकार्ता हे शहर मुसलमानबहुल आहे, तरीही तेथील राष्ट्रीय स्मारकाच्या समोरील चौकात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाची मोठी कलाकृती पहायला मिळते.

इंडोनेशिया येथील अभ्यास दौर्‍याचा वृत्तांत

इंडोनेशिया देशातील बाली बेटात हिंदू बहुसंख्येने रहतात. तेथे हिंदूंचे सर्व सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात; मात्र हे सण साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. गुढीपाडव्याचा सण नववर्षारंभ म्हणून ‘न्येपी’ या नावाने साजरा केला जातो.