
रामनाथी, ४ जुलै (वार्ता.) – महर्षींच्या आज्ञेने हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, या उद्देशांसाठी येथील सनातनच्या आश्रमात गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २ जुलै या दिवशी नृसिंह याग करण्यात आला. या वेळी मोगरा, गुलाब, कण्हेर, शेवंती आणि चाफा या पुष्पांची यज्ञात आहुती देण्यात आली. यागाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती होती. ब्रह्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी धारण केलेल्या विष्णुरूपाची प्रतिमा यज्ञस्थळी पूजेत ठेवण्यात आली होती. या प्रतिमेला यागाच्या आरंभी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मोगर्याचा पुष्पहार अर्पण केला. ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चेतन राजहंस, ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. भानू पुराणिक, श्री. शशांक जोशी, श्री. नीलेश चितळे आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक आगवेकर यांनी यज्ञात पुष्पांची आहुती दिली. सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. सिद्धेश करंदीकर, श्री. ईशान जोशी आणि श्री. अमर जोशी यांनी यागाचे पौरोहित्य केले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !