
रामनाथी (गोवा) – सनातन संस्थेच्या वतीने येथील सनातनच्या आश्रमात २० जानेवारी या दिवशी कन्नड भाषेतील उद्योगपती साधना शिबिराला चैतन्यमय वातावरणात आरंभ झाला. शिबिराच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला. त्यानंतर सुरतकल, दक्षिण कन्नड (कर्नाटक) येथील उद्योगपती श्री. एम्.जे. शेट्टी आणि हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या शिबिरात कर्नाटक राज्यातील उद्योगपती सहभागी झाले होते.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याचा परिचय हिंदु जनजागृती समितीचे श्री. शरद कुमार आणि श्री. चन्द्र मोगेर यांनी करून दिला. ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ आणि ‘गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व’ हे विषय श्री. गुरुप्रसाद गौडा अन् समितीचे श्री. अरुण कुलकर्णी यांनी मांडले.
सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
नाशिक कुंभमेळ्याच्या भव्य धर्मध्वज नगर परिक्रमेचे सनातन संस्थेने केले स्वागत !
प.पू. समर्थ शिवानंद स्वामी महाराज (भीष्माचार्य) यांचे समाधीगमन !
दीपावलीनिमित्त SanatanShop.com वर २५ % पर्यंत विशेष सवलत !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जडिगेनहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री कालभैरव देवतेचे घेतले...