‘सनातन पंचांग २०२३’च्या कन्नड भाषेतील ‘अॅप’चे लोकार्पण !

बेंगळुरू (कर्नाटक) – सनातन संस्था निर्मित ‘सनातन पंचांग २०२३’च्या कन्नड भाषेतील ‘अँड्रॉईड अॅप’चे लोकार्पण महर्षि आनंद गुरुजी यांच्या शुभहस्ते ५ जानेवारीला करण्यात आले. या प्रसंगी महर्षि आनंद गुरुजींचे सुपुत्र श्री. श्रीनिवास शर्मा गुरुजी, सनातनच्या साधिका सौ. सुधा सदानंद आणि अन्य उपस्थित होते.
या वेळी महर्षि आनंद गुरुजी म्हणाले की, ‘सनातन पंचांग २०२३’च्या अॅपमध्ये पंचांग आणि शुभ मुहूर्त, सण-व्रते, धर्मशिक्षण, राष्ट्र-धर्म रक्षण, आयुर्वेद आदी विविध विषयांवर उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. विविध माहिती असलेले हे ‘अॅप’ सामान्य हिंदूंना दैनंदिन जीवनात मार्गदर्शक आहे. सर्व भारतियांनी हे ‘अॅप डाऊनलोड’ करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावे.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !