सनातन आश्रम आणि साधक यांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र !
फोंडा – एका ई-मेलद्वारे साधकांना ठार मारण्याची धमकी देणार्या आणि जाणूनबुजून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या वाजिद सईद याच्या विरोधात सनातन संस्थेने फोंडा पोलीस ठाणे आणि रायबंदर येथील सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की,
१. भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना ठार मारण्याचा कट रचणे आणि राजस्थानमधील कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीचा शिरच्छेद करणे, या पार्श्वभूमीवर ही धमकी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.
२. ही एक स्पष्ट धमकीच आहे. सनातन आश्रम आणि तेथे रहाणारे साधक यांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र रचले जाऊ शकते. असा भयंकर कट रचणार्यांना शोधून काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. यापूर्वी बंदी घालण्यात आलेल्या ‘सिमी’ या आतंकवादी संघटनेने अशा प्रकारे ई-मेलद्वारे पत्र पाठवून लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती.
३. ही केवळ हिंसाचाराची धमकी नाही, तर या ई-मेलमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी वाजिद सईद याच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करण्यात यावी.
४. या षड्यंत्राचे अन्वेषण करण्यात यावे आणि आरोपी दोषी आढळल्यास बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत आरोपीच्या विरोधात दंडात्मक कारवाई करावी. ‘या ई-मेलकडे डोळेझाक करू नये’, ही विनंती या तक्रारीतून करण्यात आली आहे.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !