
मिरज – येथील सनातनच्या आश्रमात रहाणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची साधिका कु. ऐश्वर्या योगेश जोशी हिला १२ वीच्या परीक्षेत ८०.३३ टक्के (६०० पैकी ४८२) गुण मिळाले आहेत. ती मिरज येथील ‘ज्युबिली ज्युनियर कॉलेज’ची विद्यार्थिनी आहे.
तिला मिळालेल्या गुणांविषयी कु. ऐश्वर्या म्हणाली, ‘‘माझे १२ वीचे वर्ष चालू असतांना कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे सर्व वर्ग ‘ऑनलाईन’ होते. असे असतांनाही सेवेसाठी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात जाण्याची संधी मिळाली. तिथे अभ्यास, सेवा आणि व्यष्टी साधना यांचे नियोजन करून दिले होते. अभ्यासासमवेत सेवा आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न केल्याने त्याचा अभ्यासातही लाभ झाला. नियमित सारणी लिखाण आणि स्वयंसूचना घेतल्याने अभ्यासाचा ताण न्यून झाला, तसेच परीक्षेची भीतीही न्यून झाली. प्रसंगाचा सराव यावर स्वयंसूचना घेतल्याने परीक्षेला जातांना आत्मविश्वास वाढला. गुरुमाऊलींनी हे प्रयत्न करवून घेतले, गुरुमाऊलींची कृपा आणि पू. जयराम जोशी (कु. ऐश्वर्या हिचे आजोबा) यांच्या आशीर्वादानेच, हे यश संपादन करता आले, याविषयी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.
सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
नाशिक कुंभमेळ्याच्या भव्य धर्मध्वज नगर परिक्रमेचे सनातन संस्थेने केले स्वागत !
प.पू. समर्थ शिवानंद स्वामी महाराज (भीष्माचार्य) यांचे समाधीगमन !
दीपावलीनिमित्त SanatanShop.com वर २५ % पर्यंत विशेष सवलत !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जडिगेनहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री कालभैरव देवतेचे घेतले...