आगामी तिसऱ्या महायुद्धाचे भीषण स्वरूप !

आज अनेक देशांकडे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांच्या तुलनेत अत्यंत शक्तीशाली शस्त्रास्त्रे, अणूबाँब इत्यादी आहेत. हे पहाता तिसरे महायुद्ध किती महाविनाशकारी असेल, याचा अंदाज येतो. पुढे दिलेल्या विवेचनावरून हे अधिक स्पष्ट होईल.

१. त्रेता आणि द्वापर युगांत झालेल्या युद्धांच्या अन् कलियुगातील महायुद्धांच्या तीव्रतेचे प्रमाण

२. पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटणारे तिसरे महायुद्ध !

चारशे वर्षांपूर्वी नॉस्ट्रॅडॉमस नामक प्रसिद्ध द्रष्टा फ्रान्समध्ये होऊन गेला. त्याने बरीच भविष्ये वर्तवली आणि ती तंतोतंत खरी झाली. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांविषयी जे सांगितले, तसेच वास्तवात घडले. त्याने तिसऱ्या महायुद्धाविषयीही सांगितले आहे, ‘हे तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर होणार आहे की, तुम्हाला पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील !’

श्री. राम होनप

३. तिसऱ्या महायुद्धाची व्याप्ती

‘हे युद्ध केवळ २ – ३ देश किंवा एखादा खंड (उदा. आशिया) एवढ्यापुरतेच मर्यादित न रहाता विविध खंडांमध्ये लढले जाईल’, असे सांगितले जात आहे.

३ अ. केवळ देशाच्या सीमेवरचीच गावे नव्हेत, तर देशातील नगरे (शहरे) यांनाही प्रत्यक्ष झळ पोचवणारे तिसरे महायुद्ध !

तिसऱ्या महायुद्धात ५ ते १५ सहस्र किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर होऊ शकतो. त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची व्याप्ती केवळ सीमेवरील गावांपुरतीच मर्यादित रहाणार नाही, तर राष्ट्राराष्ट्रांतील मोठी नगरे, माहिती आणि तंत्रज्ञान केंद्रे असलेली नगरे इत्यादींनाही प्रत्यक्ष झळ पोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या नगरांवर अणूबाँब टाकण्यात आले होते आणि त्यामध्ये लाखो निरपराध नागरिक मृत्यूमुखी पडले होते. असे तिसऱ्या महायुद्धातही होऊ शकते.

३ आ. तिसऱ्या महायुद्धाच्या काळात जीवन जगण्यास अत्यंत दुष्कर अशी निर्माण होऊ शकणारी स्थिती

पुढे दिलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील स्थितीवरून तिसऱ्या महायुद्धाच्या काळातही जनतेला किती दुष्कर परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते, याचा अंदाज येतो.

३ इ. आपत्काळातील नैसर्गिक आपत्ती आणि तिसरे महायुद्ध यांचा पृथ्वीवरील परिणाम अन् त्यांचे प्रमाण

घोर आपत्काळात सुरक्षित राहिलेल्या जिवांची आध्यात्मिक पातळी सरासरी ५० टक्के इतकी असेल.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment