साधकांनो, एखाद्या साधकाचे नाव सांगून पैसे मागणार्‍या अनोळखी व्यक्तींपासून सतर्क रहा !

‘एका शहरातील एका साधिकेच्या घरी एक अनोळखी महिला दुचाकीवरून आली होती. या वेळी ती साधिका बाहेरगावी गेली होती. तिचे पती घरी होते. या महिलेने साधिकेच्या पतीला ‘तुमच्या पत्नीकडे सनातनचे ग्रंथ आणि सनातन पंचांग यांच्या वितरणाची ४-५ सहस्र रुपये रक्कम आहे, ती माझ्याकडे द्या’, असे सांगितले. या वेळी साधिकेला तिच्या पतीने भ्रमणभाष करून याविषयी विचारले असता साधिकेने ‘अशी कोणतीही रक्कम माझ्याकडून कुणाला देणे शिल्लक नाही, तसेच अशा प्रकारे माझ्याकडे कुणीही रक्कम नेण्यासाठी येणार नव्हते’, असे सांगितले. त्यानंतर साधिकेच्या पतीने संबंधित महिलेला रक्कम देणार नसल्याचे सांगितले. त्यावर त्या महिलेने ‘मी साधिकेला नंतर संपर्क करते’, असे सांगितले आणि ती निघून गेली.

अशा प्रकारे कुणी अनोळखी व्यक्ती घरी येऊन किंवा अन्य कुठेही भेटून किंवा भ्रमणभाष करून ग्रंथ आणि पंचांग वितरणाची रक्कम किंवा अन्य कोणत्या कारणास्तव पैसे मागत असेल, तर ते साधकांनी देऊ नयेत. आपली किंवा आपल्या कुटुंबियांची फसवणूक होणार नाही, यासाठी साधकांनी सतर्क रहावे. असे प्रसंग कुठे घडल्यास साधकांनी त्वरित उत्तरदायी साधकांना कळवून पुढील प्रक्रिया करावी.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment