
गोवा – सनातन संस्थेच्या ‘Survival Guide (आपत्कालीन सुरक्षा)’ या ‘अँड्रॉइड अॅप’चे १४ मेला अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते ‘ऑनलाईन सत्संगा’त लोकार्पण करण्यात आले. ‘आगामी तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमध्ये कोट्यवधी लोक मृत्यू पावतील’, अशा आशयाचे भाकीत नॉस्ट्रॅडॅमससारखे भविष्यवेत्ते, प.पू. गगनगिरी महाराज यांच्यासारखे संत, महर्षि आदींनी वर्तवले आहे. सध्याच्या जागतिक घडामोडी पहाता आपत्काळ अगदी उंबरठ्यापर्यंत आला आहे. या दृष्टीने या अॅपमध्ये ‘आपत्काळाचे स्वरूप कसे असते ? आपत्काळ येण्यामागील कारणे आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी ईश्वराची कृपा कशी संपादन करावी ? आपत्काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक, भौतिक आदी सिद्धता कशी करावी ?’, यांविषयी विवेचन केले आहे. हे अॅप मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलुगु, तमिळ, मल्ल्याळम् आणि नेपाळी या ९ भाषांत उपलब्ध आहे. एकदा वाचलेला मजकूर नंतर ‘ऑफलाईन’ (इंटरनेटच्या वापराखेरीज) वाचता येण्याची सुविधा यात आहे. हे अॅप ‘Play store’वर निःशुल्क उपलब्ध आहे. ‘वाचकांनी हे अॅप आपल्या भ्रमणभाषमध्ये डाऊनलोड करून यातील अमूल्य ज्ञानाचा लाभ करून घ्यावा, तसेच आपले परिचित, नातेवाईक यांनाही डाऊनलोड करायला सांगावे’, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक
https://www.sanatan.org/survival-guide-app
सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
नाशिक कुंभमेळ्याच्या भव्य धर्मध्वज नगर परिक्रमेचे सनातन संस्थेने केले स्वागत !
प.पू. समर्थ शिवानंद स्वामी महाराज (भीष्माचार्य) यांचे समाधीगमन !
दीपावलीनिमित्त SanatanShop.com वर २५ % पर्यंत विशेष सवलत !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जडिगेनहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री कालभैरव देवतेचे घेतले...