देवाची कृपादृष्टी राहावी आणि स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण व्हावे, यांसाठी प्रतिदिन करायच्या काही कृती !

Article also available in :

१. देवाची कृपा लाभून घराचे रक्षण
होण्यासाठी घरी प्रतिदिन देवपूजा करावी

देवपूजेमुळे आपली सात्त्विकता वाढते, आपल्या मनात भक्तीभावाचे केंद्र निर्माण होते, आपल्यावर देवतेची कृपादृष्टी होते आणि घरातील वातावरण सात्त्विक अन् प्रसन्न बनते. जो देवाला प्रतिदिन भक्तीभावाने पूजतो, तो देवाला प्रिय होतो. देवाचा प्रिय बनल्याने संकटकाळात देव त्या पूजकाचे, तसेच देवाच्या स्पंदनांनी सात्त्विक झालेल्या (पूजकाच्या) घराचे रक्षण करतो. (देवपूजेमागील शास्त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ उपलब्ध आहेत.)

 

२. देवाजवळ आणि तुळशीजवळ
दिवा लावून देव अन् दिवा यांना नमस्कार करावा !

अ. सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ४८ मिनिटांच्या (दोन घटिकांच्या) काळाला ‘संधीकाल’, असे म्हणतात. संधीकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ, तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

आ. स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधीकालात दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल. तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा. सूर्यास्तानंतरच्या संधीकालातही दिवा लावावा. (खरे तर देवाजवळ दिवा २४ घंटे तेवत असायला हवा.)

इ. ‘यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळप्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो’, असे गुरुचरित्रात सांगितले आहे. दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडेतेलाचा दिवा लावावा.

ई. देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते. देवतेच्या या कृपाकवचामुळे घराचे अन्य संकटांपासूनही रक्षण होण्यास साहाय्य होते.

 

३. स्वास्थ्य आणि संरक्षककवच
प्रदान करणारे श्‍लोक आणि स्तोत्रे म्हणावीत !

अ. संध्याकाळी दिवेलागणीनंतर घरातील मोठ्यांनी लहानांसमवेत बसून श्‍लोक, स्तोत्रे, तसेच संध्याकाळी शुभंकरोती म्हणावे.

अ १. स्तोत्रे : ‘देवतेचे स्तोत्र म्हटल्याने संकटांपासून रक्षण होते’, असे स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये सांगितलेले असते. स्तोत्रपठणामुळे निर्माण होणार्‍या सात्त्विक स्पंदनांनी घराची आध्यात्मिक शुद्धीही होते. यासाठी प्रतिदिन रामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र, देवीकवच यांसारखी आपापल्या उपास्यदेवतेची स्तोत्रे श्रद्धेने आणि भक्तीभावाने म्हणावीत.

आ. रात्री झोपतांना अंथरुणाभोवती देवतांच्या सात्त्विक नामजप-पट्ट्यांचे मंडल करावे आणि रक्षणासाठी देवतेला प्रार्थना करावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment