
अमरावती – संत प.पू. सुधांशू महाराज यांच्या येथील शिष्या सुश्री रामप्रियाजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सनातन संस्थेच्या सौ. बेला चव्हाण आणि सौ. छाया टवलारे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच त्यांना सनातन-निर्मित ग्रंथ आणि पुष्पगुच्छ भेट देऊन ६ फेब्रुवारी या दिवशी होणार्या हिंदु जनजागृती समिती आयोजित ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण दिले. या वेळी सुश्री रामप्रियाजी म्हणाल्या की, ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करीन.
हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांनी त्यांच्या संपर्कातील युवतींना समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण वर्गात सहभागी करून घेऊन प्रशिक्षण घेण्यास उद्युक्त केले. समितीकडून घेण्यात आलेल्या प्रांतीय अधिवेशनातही त्या सहभागी झाल्या होत्या. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर त्यांची श्रद्धा आहे. त्या मार्गदर्शनातून नेहमी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांविषयी प्रबोधन करतात. त्यांनी वाढदिवसानिमित्त सामूहिक सुंदरकांड पाठाचे आयोजन केले होते.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !