
‘रत्नागिरी जिल्ह्यातील एक साधक एका खासगी आस्थापनात नोकरीला होते. ते आस्थापनामध्ये प्रामाणिकपणे काम करायचे. त्यामुळे त्यांना आस्थापनाच्या मालकाने ‘आदर्श कामगार पुरस्कार’ प्रदान केला. त्यानंतर त्यांनी दोन वर्षांनी पूर्णवेळ साधनेसाठी स्वेच्छा निवृत्ती घेतली. स्वेच्छा निवृत्ती घेतल्यावर आस्थापनाच्या मालकाने त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही आस्थापनामध्ये (कंपनीत) काम करण्यासाठी थांबा. काही काम नाही केले, तरी चालेल. केवळ आस्थापनात या.’’ ते सेवेमुळे तिथे जाऊ शकत नव्हते, तर त्या आस्थापनाच्या मालकाने ‘त्यांना खर्च करण्यासाठी पैसे मिळावेत’, यासाठी त्यांना १० टक्के वेतन चालू ठेवले. ‘त्यानंतर काही मासांनी दिवाळीत खर्च करण्यासाठी त्यांना पैसे न्यून पडत असतील’, असे आस्थापनाच्या मालकाला वाटले; म्हणून त्यांनी २ सहस्र रुपये वेतन वाढवले. त्याच मासात त्या साधकाच्या आईला फुप्फुसांचा त्रास चालू झाला. त्यामुळे त्यांना महिन्याला २ सहस्र रुपयांची औषधे लागत होती. ‘साधना केल्यामुळे देव साधकांना कसे साहाय्य करतो ?’, याचे हे एक जिवंत उदाहरणच आहे’, असे वाटले.’
– श्री. रामानंद परब, सनातन आश्रम रामनाथी, गोवा (३१.१२.२०२०).
सनातन संस्था निर्मित ‘गणेश पूजा आणि आरती’ अॅपवरील ‘ऑडियो’ लावून पूजा करतांना आलेली अनुभूती !
‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त उपस्थित रहाणार्या पुणे येथील जिज्ञासूंनी केलेले प्रयत्न, त्यांना स्वतःत जाणवलेले पालट आणि...
देवघरातील ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या छायाचित्रात झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती
वैश्विक महामारीसारख्या आपत्काळात कठीण प्रसंगांना सामोरे जातांना अनुभवलेले गुरुकृपेचे कवच
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सनातन संस्थेच्या ॲप’वरील ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या सदरात सांगितल्याप्रमाणे ‘श्रीराम जय राम जय जय राम...