हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सलमा हायक यांनी ‘इन्स्टाग्राम’वर श्री लक्ष्मीदेवीचे चित्र पोस्ट करून केले गुणगान !
- सलमा हायक या कॅथोलिक ख्रिस्ती आहेत, तरीही त्यांना माता श्री लक्ष्मीदेवीचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते. भारतातील ख्रिस्ती मिशनरी मात्र हिंदूंच्या देवतांना थोतांड ठरवत असतात, तसेच तथाकथित पुरो(अधो)गामी हिंदूही त्यांचीच री ओढत रहातात !
- हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार चित्रपटांद्वारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करतात. किती हिंदी कलाकारांना हिंदूंच्या देवतांचे आध्यात्मिक महत्त्व कळते ?
नवी देहली – हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सलमा हायक यांनी ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमामध्ये एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, माता श्री लक्ष्मीदेवी आंतरिक सुंदरतेची प्रेरणा देते. जेव्हा मी माझ्या आंतरिक सुंदरतेशी अनुसंधान साधू इच्छिते, तेव्हा माता श्री लक्ष्मीदेवीचे ध्यान करते आणि योग करते.
Hinduism always outwits others, thanks to its inherent teachings to experience the Infinite !
No need to influence or deceive or force anyone to follow its principles.
Be proud to be a HINDU !@noconversion @ChakraNews @HinduAmerican @RituRathaur https://t.co/mtiJfkKOK3
— Sanatan Prabhat (@sanatanprabhat) October 9, 2020
माता श्री लक्ष्मीदेवी हिंदु धर्मामध्ये धन, सौभाग्य, प्रेम, सुंदरता, माया, आनंद आणि समृद्धी यांचे प्रतीक मानले जाते. त्यांची प्रतिमा आनंद देणारी आहे. आनंद तुमच्या आंतरिक सुंदरतेचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे.’ या पोस्टसह त्यांनी माता श्री लक्ष्मीदेवीचे चित्रही पोस्ट केले आहे.
When I want to connect with my inner beauty, I start my meditation focusing on the goddess Lakshmi.
Cuando quiero conectarme con mi belleza interior, comienzo mi meditación enfocándome en la diosa Lakshmi.#innerbeauty#hinduism#lakshmi pic.twitter.com/0gfNm5HDFO— Salma Hayek (@salmahayek) October 7, 2020
१. सलमा यांच्या या पोस्टवर हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यात ज्युलिया रॉबर्ट्स, रसेल ब्राँड, मायली सायरस यांचा समावेश आहे. भारतातही अभिनेत्री बिपाशा बसू यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
२. सलमा हायक यांना वर्ष २००३ मध्ये ‘वन्स अपॉन ए टाइम इन मैक्सिको’ या चित्रपटामुळे ओळख मिळाली होती.

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !