सनातन संस्थेशी कोणताही संबंध नसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने जी. वाय्. शितोळे या नावाने एका महाविद्यालयाच्या विरोधात ‘नॅक’च्या (राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या) बेंगळुरू येथील कार्यालयाकडे तक्रार केली. ही तक्रार करत असतांना त्या व्यक्तीने रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाचा पत्ता दिल्याचे आढळून आले आहे. ‘नॅक’च्या कार्यालयातून सनातन संस्थेच्या नावावर पत्र आल्यानंतर या प्रकाराचा आम्हाला खुलासा झाला.
जी. वाय्. शितोळे नावाची कोणतीही व्यक्ती सनातन संस्थेच्या आश्रमात रहात नाही, तसेच अशा नावाच्या कोणत्याही व्यक्तीशी सनातन संस्थेचा काहीही संबंध नाही. सनातन संस्थेच्या नावाचा उपयोग करून ही व्यक्ती इतरांचीही दिशाभूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साधक, वाचक आणि हितचिंतक यांनी या नावाच्या व्यक्तीपासून सावध रहावे. तसेच अशा नावाची कोणतीही व्यक्ती सनातन संस्थेचा उल्लेख करून कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत असल्यास संबंधितांनी कायदेशीर कारवाईच्या मार्गाचा अवलंब करावा. तसेच या संबंधी कोणतीही माहिती उपलब्ध असल्यास तात्काळ पुढील पत्त्यावर संपर्क साधावा, ही विनंती.
नाव आणि संपर्क क्रमांक
श्री. वीरेंद्र मराठे, दू.क्र. (०८३२) २३१२३३४
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : श्री. वीरेंद्र मराठे, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !