‘ऑनलाईन सत्संग शृंखले’तील सर्व सत्संग ‘यू ट्यूब’वर उपलब्ध असून आपल्या वेळेनुसार या सत्संगांचा लाभ घ्या !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘समाजाला नामजपादी साधनेचे महत्त्व समजावे, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याचा प्रसार व्हावा’, या दृष्टीने सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन सत्संग शृंखला’ प्रसारित करण्यात येत आहे. देशभरात दळणवळण बंदी लागू झाल्यामुळे घरोघरी जाऊन अध्यात्मप्रसार करण्याला मर्यादा येत आहेत. सत्संगांच्या माध्यमातून त्यापेक्षा अधिक व्यापक प्रसार होत असून समाजाला आपत्काळातही नवसंजीवनी मिळत आहे.

कार्यालयीन कामांची व्यस्तता, तसेच कौटुंबिक दायित्व यांमुळे काही जिज्ञासूंना सत्संगांचा नियमितपणे लाभ घेता येत नाही. ‘हे जिज्ञासू सत्संगांपासून वंचित राहू नयेत’, यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या ‘यू ट्यूब’ वाहिनीवरील (चॅनेलवरील) ‘प्ले लिस्ट’वर आतापर्यंत (दळणवळण बंदीच्या काळात) प्रसारित झालेले सर्व सत्संग २४ घंटे उपलब्ध करण्यात आले आहेत. जिज्ञासू आपल्या वेळेनुसार कधीही हे सत्संग पाहू शकतात. सर्वांनी आपले आप्तस्वकीय, स्नेही, कार्यालयीन सहकारी आदींना या संदर्भात सांगून सत्संगांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे.

 

पुढील ‘यू ट्यूब’ मार्गिकेवर (लिंकवर) सर्व सत्संग उपलब्ध !

http://youtube.com/HinduJagruti 

http://youtube.com/SanatanSanstha1

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment