- केवळ एका आठवड्यात ५ सहस्रांहून अधिक वेळा डाऊनलोड
- ‘अॅप’ला ५ पैकी ५ (सर्वोच्च) मूल्यांकन
मुंबई – भाविकांना श्राद्धविधीविषयी शास्त्रीय माहिती मिळावी, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्राद्धविधी’ या ‘अँड्रॉइड अॅप’ची निर्मिती करण्यात आली. यामध्ये श्राद्धाचे महत्त्व, प्रकार, श्राद्धच्या संदर्भात शंकानिरसन आदी ज्ञान देणारे लेख, भगवान दत्तात्रेय यांच्यावर आधारित लेख आणि दत्तात्रेय देवतेचा ऑडिओ स्वरूपात नामजप उपलब्ध आहे. मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या ४ भाषांमध्ये उपलब्ध असणारे हे ‘अँड्रॉइड अॅप’ २ सप्टेंबर २०२० या दिवशी, म्हणजे एका आठवड्यापूर्वी ‘प्लेे-स्टोअर’वर उपलब्ध झाले होते. केवळ एका आठवड्याच्या कालावधीत ते ५ सहस्रांहून अधिक वेळा डाऊनलोड झाले आहे. त्यामुळे अनेकांना हे ‘अॅप’ आवडल्याची जणू पावतीच मिळाली आहे. ‘प्लेे-स्टोअर’वर आजपर्यंत १५१ जणांनी मूल्यांकन दिले आहे. विशेष म्हणजे सर्वांनीच ‘अॅप’ला ५ पैकी ५ (सर्वोच्च) मूल्यांकन दिले आहे.
‘अॅप’ डाऊनलोड करण्यासाठीची लिंक : https://www.sanatan.org/shraddha-app

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !