फोंडा (गोवा) – सनातन संस्थेचे नवीन ‘श्राद्ध रिच्युअल्स’ (Shraddh Rituals) अॅप आणि हिंदु जनजागृती समितीचे नव्या स्वरूपातील ‘अँड्रॉइड अॅप’ यांचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते २ सप्टेंबर या दिवशी लोकार्पण करण्यात आले. सनातन संस्थेचे ‘श्राद्ध रिच्युअल्स’ हे अॅप श्राद्ध विधीसंबंधी असून ते मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या ४ भाषांत, तर हिंदु जनजागृती समितीचे नव्या स्वरूपातील अॅप मराठी, हिंदी आणि इंग्रजी या ३ भाषांत उपलब्ध आहे. ही दोन्ही अॅप्स ‘प्ले स्टोअर’वर निःशुल्क उपलब्ध आहेत. ‘सनातन प्रभात’चे वाचक, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती संकेतस्थळाचे वाचक, जिज्ञासू, धर्मप्रेमी, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांनी ‘हे अॅप भ्रमणभाषमध्ये ‘डाऊनलोड’ करून यातील अमूल्य ज्ञानाचा लाभ करून घ्यावा, तसेच आपले परिचित, नातेवाईक यांनाही डाऊनलोड करायला सांगावे’, असे आवाहन या दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
सनातन संस्थेच्या ‘श्राद्ध रिच्युअल्स’ अॅपची वैशिष्ट्ये
- श्राद्धविषयीची शास्त्रीय माहिती
- श्राद्ध विधीसंबंधी विविध व्हिडिओ
- भगवान दत्तात्रेयांसंबंधी लेख
- ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजपाचा ऑडिओ

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !